छत्रपती संभाजीनगर : अंत्योदय रेशन कार्डधारकांना वर्षातून एकदा साडी दिली जाणार आहे. प्रजासत्ताक दिन ते होळी या काळात साडीचे वितरण होणार आहे. जिल्ह्यात सुमारे ६६ हजार १०५ कुटुंबांना साडीचे वितरण होणार आहे. २९ हजार साड्यांचा पुरवठा शासनाकडून झाला आहे. पुरवठा विभागाकडून वितरणाचे नियोजन सुरू आहे.
अंत्योदय कार्डधारकांना एक साडी मोफतअंत्योदय कार्डधारकांना एक साडी मोफत दिली जाणार आहे. त्याचे वितरण मार्च अखेरपर्यंत होईल. त्यानुसार साड्यांचा पुरवठा होत आहे.
होळीपर्यंत होणार वाटपहोळीपर्यंत साड्यांचे वाटप होणार आहे. शासनाच्या त्यानुसार सूचना आहेत.
कोणत्या तालुक्यात किती कार्डधारकांना मिळणार साडी?तालुका....................कार्डधारकछत्रपती संभाजीनगर......२१३८धान्य वितरण विभाग.......३३०३९फुलंब्री....२२६०सिल्लोड... ४६२७सोयगाव...२७५४कन्नड...५०८९खुलताबाद...१८२२वैजापूर....४३७३गंगापूर....३५४७पैठण....६६३६एकूण......६६१०५
वाटप लवकरच सुरू होईल...जिल्ह्यातील अंत्योदय कार्डवर लवकरच साडीचे वाटप केले जाणार आहे. २९ हजार साड्या सध्या प्राप्त झाल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण कोटा प्राप्त होणे शक्य आहे.- जिल्हा पुरवठा विभाग, छत्रपती संभाजीनगर.