शेंद्रा : वडखा येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम तसेच जानकीबाई बजाज फौण्डेशन यांच्या कोविड प्रतिबंधक मोफत लसीकरण शिबिराचे उद्घाटन मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, बजाज समूहाचे सीईओ सी.पी. त्रिपाठी, बांधकाम सभापती किशोर बलांडे, आरोग्य सभापती अविनाश गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत दाते, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल काकड, पंचायत समिती सभापती छाया घागरे, तहसीलदार ज्योती पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे, सरपंच बेबी काकडे, उपसरपंच तुळसाबाई काकडे, नंदकिशोर काकडे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
कॅप्शन...
वडखा येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण व जंतनाशक मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, माजी विधानसभा सभापती हरिभाऊ बागडे, जि.प. अध्यक्षा मीना शेळके, बजाज समूहाचे सीईओ त्रिपाठी, सभापती किशोर बलांडे, अविनाश गलांडे, छाया घागरे, डॉ. सुधाकर शेळके आदी.