वाळूज महानगर : पाणीटंचाईमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करुन पाणीपुरवठा सुरु करण्यात आला. विभागप्रमुख कैलास हिवाळे यांनी स्वखर्चातून पाणीपुरवठा सुरु केल्यामुळे टंचाईच्या काळात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
रांजणगाव ग्रामपंचायतीकडून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे पैसे देवूनही टँकर मिळत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पाण्यासाठी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेचे विभाग प्रमुख कैलास हिवाळे यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून नागरिकांसाठी मोफत पाणीपुरवठा सुरु केला आहे.
येथील टंचाईग्रस्त भागात नागरिकांना पाणी भरण्यासाठी १ हजार क्षमतेच्या १५ टाक्या बसविण्यात आल्या आहेत. जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करुन मोफत पाणीपुरवठ्याला सुरुवात झाली.
यावेळी विभाग प्रमुख कैलास हिवाळे, ग्रा.पं. सदस्य शिवराम ठोंबरे, रावसाहेब भोसले, भगवान साळुंखे, अमोल लोहकरे, प्रविण दुबिले, लक्ष्मण साध्ये, गजानन रावळकर, प्रदीप सवई, गजानन घायवट, हरिदास चव्हाण, ईश्वर वाघचौरे, कैलास भागवत, बाळू माकोडे, भगवान गायकवाड आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.