शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

स्वातंत्र्यसंग्राम स्मारकाचे आज होणार लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:19 AM

क्रांतीचौक येथील भव्य अशा ध्वजस्तंभ तथा ‘स्वातंत्र्यसंग्राम’ स्मारकाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी ५ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : क्रांतीचौक येथील भव्य अशा ध्वजस्तंभ तथा ‘स्वातंत्र्यसंग्राम’ स्मारकाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी ५ वाजता राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती ध्वजस्तंभ समितीचे राम भोगले, मानसिंह पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त डी. एम. मुगळीकर, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, जि. प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर, खा. रावसाहेब दानवे, खा.राजकुमार धूत, आ. विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, अब्दुल सत्तार, प्रशांत बंब, हर्षवर्धन जाधव, संदीपान भुमरे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर आदींची उपस्थिती राहणार आहे.उद्योजक राम भोगले म्हणाले, एप्रिल २०१६ मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट यांनी ध्वजस्तंभासंदर्भात शहरातील अधिका-यांनी पहिली बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यानंतर जागेचा शोध घेऊन क्रांतीचौकातील जागा समितीने निश्चित केली. जुलै २०१६ पासून स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. स्मारकाच्या जागेपासून काही अंतरावर छत्रीसारखा काला चबुतरा होता. खुल्या मैदानावर तटबंदी लावण्यात आल्याप्रमाणे असलेली ही जागा खाजगी मालकीच्या नावावर होती, त्यामुळे त्या जागेचा प्रश्नच येत नाही, असेही पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. ध्वजस्तंभासाठी अडीच कोटी रुपये पूर्णत: लोकसहभागातून उभारण्यात आले आहेत. १८ शाळांमधील विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५० रुपयांचा निधी गोळा करण्यात आला.