शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

मतदार नोंदणी मोहिमेचा फज्जा

By admin | Published: June 29, 2014 12:59 AM

सुनील कच्छवे औरंगाबाद आयोगातर्फे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेचा शनिवारी फज्जा उडाला.

सुनील कच्छवे  औरंगाबादआयोगातर्फे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहिमेचा शनिवारी फज्जा उडाला. नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवरच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) दिवसभर उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षात शहरातील अनेक केंद्रांवर हे बीएलओ पोहोचलेच नाहीत, तर काही केंद्रांवर बीएलओ असूनही त्यांच्याकडे नोंदणीचे अर्जच नव्हते. त्यामुळे नोंदणीसाठी आलेल्यांना केंद्रांवरून परत जावे लागले.उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने राज्यात ९ जूनपासून मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत आतापर्यंत तहसील आणि उपविभागीय कार्यालयातच मतदार नोंदणी अर्ज स्वीकारले जात होते. मात्र, जास्तीत जास्त लोकांना नावे नोंदविता यावीत यासाठी आयोगाने २८ व २९ जून रोजी विशेष नोंदणी कार्यक्रम राबविण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर दोन्ही दिवस बीएलओ दिवसभर हजर राहून नोंदणी अर्ज स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच मतदार यादीतील नावांची खात्री करण्यासाठी बीएलओंकडे प्रारूप याद्या ठेवण्यात येणार असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात अनेक केंद्रांवर बीएलओ पोहोचलेच नाहीत. शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली असता ही बाब उघड झाली.शहरातील मध्यवर्ती भागातील शिशुविहार प्राथमिक विद्यालय, गारखेडा परिसरातील कडा कार्यालय, खडकेश्वर येथील पालिकेचे वाचनालय, सिल्लेखाना येथील विभागीय ग्रंथालय आदी ठिकाणी बीएलओ गैरहजर होते. कडा कार्यालयातील मतदान केंद्रावर दुपारी १२ नंतर बीएलओ आले.मात्र, त्यांच्याकडेही नोंदणी अर्ज नव्हते. सातारा परिसरातील अयप्पा मंदिर येथे सकाळपासून बीएलओ हजर होते. परंतु त्यांच्याकडेही मोजकेच अर्ज होते. दुपारपर्यंत तेही संपले. न्यू हनुमाननगरातील सुधाकरराव नाईक विद्यालय केंद्रांवर पाच बीएलओ उपस्थित होते. मात्र, त्यांच्याकडेही पुरेसे अर्ज उपलब्ध नव्हते. जवाहर कॉलनीतील मनपा शाळेत केवळ नावनोंदणीचेच अर्ज होते. समता कॉलनीतील समता दर्शन श्रमिक महिला वसतिगृह केंद्रावर दुपारीच अर्ज संपले. त्यामुळे नावनोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. कुठे बीएलओ नसल्यामुळे तर कुठे अर्जच उपलब्ध नसल्याने नागरिकांना परत जावे लागले. नागरिक परतलेशहरातील बहुतेक केंद्रांवर बीएलओ पोहोचले नसल्यामुळे या ठिकाणी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले. औरंगपुरा येथील शिशुविहार विद्यालयाच्या केंद्रावर दिवसभर नागरिक येत होते; परंतु त्या ठिकाणी नोंदणी करून घेण्यासाठी कुणीच हजर नव्हते.सुरक्षारक्षकाला विचारल्यावर बीएलओ आलेलेच नसल्याचे त्यांना कळायचे. त्यामुळे ते निघून जायचे. कडा केंद्रावरही दुपारपर्यंत बीएलओ आलेले नव्हते. त्यामुळे येथेही नोंदणीसाठी आलेले अनेक जण माघारी गेले.२०-२० अर्जांचाच पुरवठाशहरातील बहुतेक केंद्रांवरील बीएलओंकडे मोजकेच अर्ज होते. दुपारनंतर हे अर्ज संपल्यामुळे काहींना झेरॉक्स काढून ते वापरावे लागले.बीएलओंनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक शाखेकडूनच पुरेशा अर्जांचा पुरवठा झालेला नव्हता. प्रत्येक बीएलओला जेमतेम १० ते २० अर्जच देण्यात आले होते. दुरुस्ती अर्जांचा तुटवडाविशेष मोहिमेंतर्गत नवीन नावनोंदणीबरोबरच नावातील दुरुस्ती तसेच स्थलांतराचे अर्जही भरून घेणे अपेक्षित होते. मात्र, आजच्या मोहिमेदरम्यान काही अपवाद वगळता अनेक बीएलओ यांच्याकडे दुरुस्ती आणि स्थलांतराचे अर्ज उपलब्ध नव्हते. आयोगाकडूनच पुरवठा नाहीउपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांना विचारले असता ते म्हणाले की, या मोहिमेसाठी नवीन नोंदणीचे अर्ज पुरेशा प्रमाणावर दिले होते. दुरुस्ती आणि स्थलांतरासाठीच्या अर्जांचा आयोगाकडूनच पुरवठा झालेला नव्हता. त्यामुळे ते अर्ज उपलब्ध करून देता आले नाहीत. तरीही स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले काही अर्ज बीएलओंकडे वितरित करण्यात आले होते.