शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

११ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या जड वाहनांना ‘औट्रम घाटातून’ वाहतुकीस बंदी

By प्रभुदास पाटोळे | Published: August 05, 2023 1:59 PM

वाहतूककोंडी रोखण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

छत्रपती संभाजीनगर : वाहतूककोंडी रोखण्यासाठी सोलापूर-धुळे महामार्ग क्रमांक २११ वरील औट्रम घाटातून सर्व प्रकारच्या जड वाहनांना खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी ११ ऑगस्ट २०२३ पासून बंदी घातली आहे. शिवाय वन आणि वन्यप्राण्यांना नुकसान होऊ नये, यासाठी गौताळा अभयारण्यातून पर्यायी मार्गाला परवानगी देण्यास खंडपीठाने नकार दिला.

सर्व जड वाहने, मल्टी एक्सल वाहने, ट्रक, दूध, एलपीजी, पेट्रोल, डिझेल आदींची वाहतूक करणारे टँकर, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बस या जड वाहनांना खंडपीठाने ११ ऑगस्टपासून बंदी घातली. या आदेशाबाबत प्रतिवादी छत्रपती संभाजीनगर आणि जळगावचे परिवहन अधिकारी (आर.टी.ओ.) आणि या दोन्ही जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक, तसेच चाळीसगावचे पोलिस उपअधीक्षक यांना जनजागृतीसाठी ११ ऑगस्टपर्यंत ७ दिवसांचा वेळ खंडपीठाने दिला आहे.

जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्गऔट्रम घाटाकडे न जाता याचिकाकर्त्यांनी सुचविल्यानुसार चाळीसगावकडे, तसेच मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर-दौलताबाद टी पॉइंट-रंगारी देवगाव-शिऊर बंगला-वाकला-पिंपरखेड-न्यायडोंगरी मार्गे चाळीसगावकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गाला, तसेच नांदगावहून मालेगाव मार्गे मुंबई-आग्रा महामार्गाकडे जाण्यास खंडपीठाने परवानगी दिली.

महसुलापेक्षा लोकांच्या सोयी महत्त्वाच्यापर्यायी मार्गाने वाहतूक वळविल्यास ‘टोल’ (महसूल)चे नुकसान होईल, असा मुद्दा सुनावणीदरम्यान ‘एनएचएआय’चे वकील सुहास उरगुंडे यांनी उपस्थित केला असता वाहतूककोंडीमुळे अपघात होतात. गुन्हे घडतात, लोकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. यामुळे महसुलापेक्षा लोकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. गुरुवारी औट्रम घाटात झालेल्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी रात्रभर घाटात अडकल्याच्या घटनेची खंडपीठाने गंभीर दखल घेतली. सोलापूर-धुळे महामार्गाच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणाला खंडपीठाने परवानगी दिली. याचिकाकर्ते ॲड. ज्ञानेश्वर बागूल, ॲड. नीलेश देसले आणि ॲड. श्रीकृष्ण चौधरी, तर शासनातर्फे मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी काम पाहिले.

औट्रम घाटातून केवळ याच वाहनांना वाहतुकीची परवानगीशेतकऱ्यांची हलकी वाहने, ट्रॅक्टर, दुचाकी, जीप, महाराष्ट्र आणि परराज्यांच्या परिवहन खात्याच्या प्रवासी बस, रुग्णवाहिका, अग्निशमन विभागाची वाहने, तसेच घाटात एखादे वाहन अडकले असेल तर ते काढण्यासाठी क्रेन आणि आपत्कालीन काळात पॅरा मिल्ट्रीची वाहने आणि पोलिसांची वाहने यांनाच ११ ऑगस्टनंतर चाळीसगावकडे जाणाऱ्या औट्रम घाटातून वाहतुकीची परवानगी असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

टॅग्स :highwayमहामार्गAurangabadऔरंगाबादAccidentअपघात