छत्रपती संभाजीनगर : भारताने एकूण ११६ देशांसोबत द्विपक्षीय हवाई करार केला आहे. त्यानुसार विविध शहरांतून आंतरराष्ट्रीय विमानसेवेला चालना देण्यात येणार आहे. यात छत्रपती संभाजीनगरचाही समावेश असल्याने लवकरच आंतरराष्ट्रीय विमानाचे ‘टेकऑफ’ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.छत्रपती संभाजीनगरहून ऑक्टोबरपासून बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. आता भारताने जागतिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ११६ देशांसोबत द्विपक्षीय हवाई सेवा करारांवर स्वाक्षरी केली. त्यानुसार विविध शहरातून विमानसेवा सुरू होईल. आर्थिक आणि पर्यटन वाढीसही हातभार लागणार आहे.
ऑक्टोबरपासून थायलंडसाठी विमानसेवाया करारामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल. ऑक्टोबरपासून थायलंडसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. इतर देशांसाठी विमानसेवा सुरू होईल, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- सुनीत कोठारी, अध्यक्ष, सिव्हिल एव्हिएशन कमिटी, एटीडीएफ
‘पोर्ट ऑफ कॉल’मध्ये समावेश व्हावाआजघडीला आशियाई देशांना ओपन एअर पाॅलिसी आहे. जर छत्रपती संभाजीनगरचा ‘पोर्ट ऑफ कॉल’मध्ये समावेश केला तर अधिक फायदा होईल. विशेष म्हणजे हज-उमरासाठी दुबईपर्यंत विमानसेवा ऑपरेट होऊ शकेल. परदेशातून थेट चार्टर विमानेही येऊ शकतील.- जसवंत सिंग, अध्यक्ष, टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन (एटीडीएफ)