शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

तेजा ते रसगुल्ला, लाल मिरची स्वस्त झाली; पण अतितिखट, झणझणीत खाणे पडू शकते महाग

By प्रशांत तेलवाडकर | Published: February 27, 2024 5:52 PM

तिखट झणझणीत पदार्थ खाणाऱ्यांसाठी लाल मिरची गोड

छत्रपती संभाजीनगर : तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरची गोड झाली... असा मथळा वाचल्यावर तुम्ही थोडे संभ्रमात पडला असाल... पण, बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर याची सत्यता लक्षात येते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन लाल मिरचीचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत. यामुळे खवय्यांसाठी ही बातमी गोडच ठरत आहे. मिरची स्वस्त झाली असली तरी सावधान, कारण अतितिखट खाणेही पडू शकते महाग...

कशामुळे लाल मिरची स्वस्तसर्वाधिक लाल मिरची उत्पादक राज्य म्हणजे आंध्र प्रदेश होय. या राज्यात मिरचीचे उत्पादन यंदा मुबलक प्रमाणात झाले आहे. तसेच, कर्नाटक राज्यातही लाल मिरचीचे उत्पादन समाधानकारक आहे. यामुळे नवीन लाल मिरचीची आवक वाढली व भाव कमी झाले आहेत.

लाल मिरचीचे भाव किती कमी झाले?प्रकार फेब्रुवारी २०२३ (किलो) फेब्रुवारी २०२४१) तेजा (कर्नाटक) ३०० ते ३५० रु. --- २५० ते ३०० रु.२) ब्याडगी - ७०० ते ७५० रु---३०० ते ३५० रु.३) गुंटूर (आंध्र प्रदेश) ३५० ते ४०० रु. ---२५० ते २८० रु.४) चपाटा ५०० ते ५५० रु.--- ३०० ते ४०० रु.५) रसगुल्ला ९५० ते १००० रु.---६५० ते ७५० रु.

कमी तिखट खाणाऱ्यांसाठी ‘रसगुल्ला’१) जास्त तिखट खाणाऱ्यांसाठी कर्नाटकची तेजा मिरची प्रसिद्ध आहे.२) कमी तिखट खाणाऱ्यांनी ब्याडगी, रसगुल्ला ही मिरची खरेदी करावी.३) भाजीत तर्रीदार व घट्टपणा येण्यासाठी चपाटा मिरचीचा वापर करावा.४) मध्यम तिखटपणा ‘गुंटूर’ मिरचीत असतो.५) शहरात तिखट खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.६) शहरात तेजा व गुंटूर मिरची ८० टक्के विकली जाते.

हंगामाला सुरुवातउन्हाळ्यात लाल मिरची खरेदीचा हंगाम असतो. या काळात नवीन मिरची बाजारात येते. भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी असल्याने वार्षिक मिरची खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत आहेत.- स्वप्निल जैन, व्यापारी

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMarketबाजारAurangabadऔरंगाबाद