शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

अतिक्रमणाविरोधात परंडा पालिकेवर मोर्चा

By admin | Published: February 28, 2017 12:49 AM

परंडा : मागील काही दिवस शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली

परंडा : मागील काही दिवस शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली असून, पालिका प्रशासनाने ती हटविण्याची मागणी जोर धरीत आहे. दरम्यान, शहरातील खासापुरी रोडलगत टेलिफोन आॅफिसशेजारीही अनधिकृतरित्या बांधकाम झाले असून, सदर बांधकाम तातडीने हटवावे या मागणीसाठी प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांनी सोमवारी शहरातून ढोल-ताशांच्या गजरात पालिकेवर मोर्चा काढला़ मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केले़परंडा शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधून जाणाऱ्या खासापुरी मार्गावर टेलिफोन आॅफिसच्या सुरक्षा भिंतीलगत नगर परिषदेची रिकामी जागा आहे. ही जागा नगर परिषदेने काही नागरिकांना भाडेतत्त्वावर दिलेली आहे. सदरील नागरिक नियमाप्रमाणे भाडेपट्टा भरत आहेत. सदर रस्ता हा पालखी मार्ग आहे. परिसरात माध्यमिक शाळा आहे. या मार्गावरून वाहनांची सतत रेलचेल असते. याच मार्गावरील पालिकेच्या उर्वरित जागेवर काही व्यक्तीकडून विनापरवाना अनधिकृत चार गाळ्यांचे बांधकाम करण्यात आल्याचा या भागातील नागरिकाचा आरोप आहे़ अनधिकृत व्यापारी संकुलाच्या निर्मितीमुळे येथील नागरिकांना रहदारीस अडथळा होणार आहे़ त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांनी हे बांधकाम त्वरित पाडावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे या नागरिकांनी दिला. सदर निवेदनावर संभाजी मस्के, दत्तात्रय काटवटे, नारायण जाधव, सुरेश काशीद, नागेश काशीद, विशाल काशीद, अभिमान काशीद, आण्णा लोकरे, रोहन काटवटे, बंडू जाधव, अनिकेत काशीद, संतोष काशीद, हनुमंत काशीद, अतुल काशीद, आकाश काशीद, विनायक काटवटे, औदुंबर हातोळकर, शुभम काशीद, सुखदेव काशीद आदींसह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)