औरंगाबाद : सिडको बसस्थानकातून रवाना होणाऱ्या एसटी बसगाड्यांना रिक्षांच्या अडथळ्याला तोंड द्यावे लागत आहे. प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या वळणावरच रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे बसचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सत्यमनगर रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
औरंगाबाद : शहरातील सत्यमनगर परिसरातील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागले आहे. वेळीच कचरा उचलला जात नसल्याची परिस्थिती आहे. मनपाने रस्त्यावरील कचरा तत्काळ उचलण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सिडको उड्डाणपुलाखालून धोकादायकरित्या ये-जा
औरंगाबाद : शहरातील सिडको उड्डाणपुलाखालून धोकादायक पद्धतीने वाहनांची ये- जा होत आहे. उड्डाणपुलाखालील जागा मोकळी करण्यात आली आहे. या ठिकाणाहून रिक्षाचालक अचानक वळण घेतात. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण होत आहे.
शहरातील रस्त्यांवर विनाक्रमांकाचे टँकर
औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर क्रमांक नसलेले पाण्याचे टँकर बिनधास्त धावताना दिसत आहे. विशेषतः जालना रोडवर असे टँकर पहायला मिळत आहे. रस्त्याने पाणी सांडत जाणाऱ्या टँकरकडे वाहतूक पोलिसांचे लक्षही जात नाही. अशा टँकरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उड्डाणपुलाच्या उतारावरील खड्डे बुजविण्याची मागणी
औरंगाबाद : सिडको उड्डाणपुलावरून मुकुंदवादीकडे जाताना ऐन उतारावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वेगात येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक मारावा लागतो. यातून अपघात होण्याची शक्यता असल्याने खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.