शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

राजेंद्र दर्डा यांची प्रचारात आघाडी

By admin | Published: September 29, 2014 12:55 AM

औरंगाबाद : पदयात्रांच्या धडाक्याने प्रचाराला सुरुवात करून राजेंद्र दर्डा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

औरंगाबाद : पदयात्रांच्या धडाक्याने प्रचाराला सुरुवात करून राजेंद्र दर्डा यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. शनिवारच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळल्यानंतर रविवारी सकाळी राजेंद्र दर्डा यांनी मायानगर, ठाकरेनगर, राजीव गांधीनगर आणि जयभवानीनगर या भागांमध्ये पदयात्रा काढली. पदयात्रेत सहभागी झालेल्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सकाळी ८.३० वाजता राजेंद्र दर्डा जसे मायानगर भागात पोहोचले, तसे कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत केले. शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रा ठाकरेनगरात पोहोचल्यानंतर विठ्ठल-रुख्माई मंदिरात राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. औरंगाबादच्या सर्वांगीण विकासासाठी राजेंद्र दर्डा यांना निवडून देण्याचे साकडे रहिवाशांनी विठ्ठलाला घातले. त्यानंतर पदयात्रा मुकुंद सोसायटी या भागात पोहोचली. परिसरातील महिलांनी राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचे दारात रांगोळी काढून स्वागत केले. तसेच राजेंद्र दर्डा यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. ‘जय हो’च्या घोषणांनी आणि ढोल- ताशांच्या गजरात निघालेली पदयात्रा राजीव गांधीनगरात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. राजेंद्र दर्डा यांनी परिसरातील प्रत्येक घरात जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले. सकाळी ११ वाजता राजेंद्र दर्डा यांची प्रचार रॅली संत तुकोबानगरात पोहोचली. परिसरातील शेकडो कार्यकर्ते या रॅलीत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पुढे कामगार चौकापासून रॅली जयभवानीनगरात पोहोचताच फटाक्यांच्या आतषबाजीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राजेंद्र दर्डा यांनी अभिवादन केले. त्यानंतर जयभवानीनगरातील गल्ल्यांमध्ये घरोघर जाऊन राजेंद्र दर्डा यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या. सकाळी ११.३० वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला. या पदयात्रेत काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्ते, युवक, महिला आणि समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बायजीपुरा, इंदिरानगरात जल्लोषराजेंद्र दर्डा यांची पदयात्रा दुपारी ४.३० वाजता जशी बायजीपुरा भागात पोहोचली तसा युवा कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने कार्यकर्ते व समर्थकांनी राजेंद्र दर्डा यांचे स्वागत केले. एमजीएम कॅम्पसपासून सुरू झालेली पदयात्रा जशी बायजीपुरा व इंदिरानगरात पुढे जात होती, तसा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. पुढे मोठ्या संख्येने कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. पदयात्रेदरम्यान राजेंद्र दर्डा हे प्रत्येक मतदारांशी संवाद साधत होते. अनेक घरांमध्ये जाऊन त्यांनी थोरा-मोठ्यांच्या दुवा आणि आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे महिला व युवकांनी त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे पदयात्रा इंदिरानगर भागात पोहोचली. पदयात्रेत लहान मुलांचा उत्साहदेखील पाहण्याासारखा होता. काँग्रेसच्या विविध घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला होता. सायंकाळी ७.४० वाजता पदयात्रेचा समारोप झाला.