शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

परतूर मतदारसंघात इच्छुकांची मोर्चेबांधणी

By admin | Published: June 12, 2014 11:57 PM

शेषराव वायाळ , परतूर परतूर विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटीवर भर दिला आहे.

शेषराव वायाळ , परतूरपरतूर विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. याबरोबरच कोणत्या पक्षाचे तिकीट कोणाला मिळेल याचा आजच खात्रीलायक अंदाज बांधता येत नसल्याने ‘तिकिटाच्या’ चर्चाही चांगल्याच रंगत आहेत.लोकसभा निवडणुकीत या मतदार संघाने सेनेचे उमेदवार संजय जाधव यांना जवळपास २५ हजार मतांची आघाडी दिली. आता विधानसभेचे चित्र काय असेल याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत. विद्यमान आ. सुरेशकुमार जेथलिया हे मागील वेळी सेनेत असताना बंडखोरी करत अपक्ष म्हणून विजयी झाले. यावेळी ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. अद्याप त्यांनी काँग्रसमध्ये प्रवेश घेतला नसला तरी ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात राहून सर्व कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांचा काँग्रस प्रवेश निश्चित मानला जातो. नगर पालिकेच्या मध्यमातून व आपल्या आमदारकीच्या काळात केलेल्या विकास कामांचे गणित जुळवत ते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. बाबासाहेब आकात यांनी मागील वेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळीही जोरात तयारीला लागले आहेत. मागील आठवड्यात सभापती आकात यांच्या निवासस्थानी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचे झालेले चहापान याची जोरात चर्चा सुरू आहे. शैक्षणिक संस्थांचे त्यांचे जाळे, बाजार समितीतील सत्ता, ग्रामीण भागात वाढलेला जनसंपर्क त्यामुळे सभापती आकात हे एखाद्या पक्षाचे तिकीट मिळवतात की पुन्हा अपक्ष निवडणूक लढवतात हा सध्या चर्चेचा विषय आहे. भाजपाचे माजी आ. बबनराव लोणीकर विधानसभा निवडणूक डोळ्यासमारे ठेवून ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवित आहेत.आमदारकीच्या काळातील कामे पंचायत समितीतील भाजपाची सत्ता, जि. प. मधील आपल्या पुत्राकडे असलेले उपाध्यक्षपद यांच्या माध्यमातून केलेला विकास व ‘मोदी’ लाट या जमेच्या बाजू घेवून पुन्हा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. काँग्रेसचे अ‍ॅड. अन्वर देशमुख हे मागील निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. यावेळी ते पुन्हा तिकिटावर दावा करून निवडणूक लढवतात की, श्रेष्ठींच्या सांगण्यानुसार शांत राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच हंसादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा गायक प्रा. राजेश सरकटे हेही सामाजिक कार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात दौरे करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत तेही एखाद्या पक्षाचे तिकीट आणणार असल्याची चर्चा आहे. नसता अपक्ष का होईना; निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ भाजपाला सुटलेला असला तरी शिवसेनेचे ए. जे. बोराडे, माधवराव कदम हेही विधानसभेसाठी पक्षाकडे आग्रह धरणार असल्याचे बोलले जाते. तर मनसे कडून पी. एन. यादव, श्रीराम राठोड, श्रीनिवास हजारे, प्रकाश सोळंके हे तिकिटासाठी दावा करु शकतात. एकूणच यावेळी होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक वेगळे गणित मांडणारी ठरणार आहे. या मतदारसंघात औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, निम्न दुधना प्रकल्पातील धरणग्रस्तांचे प्रश्न, रस्ते, सिंचन आदी प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची आजही गरज आहे. २००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मतेअपक्षसुरेश जेथलिया42702भाजपाबबनराव लोणीकर31200काँग्रेस अन्वर देशमुख30161इच्छुकांचे नाव पक्षसुरेश जेथलिया अपक्षबाबासाहेब आकातअपक्षअन्वर देशमुखकाँग्रेसराजेश राठोडकाँग्रेसबबनराव लोणीकरभाजपाए.जे. बोराडेशिवसेनामाधवराव कदमशिवसेनाराजेश सरकटेअपक्षपी.एन. यादवमनसेश्रीनिवास हजारेमनसेप्रकाश सोळंकेमनसे