शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

मराठवाड्यासाठी एमआयडीच्या माध्यमातून इंधन डेपो; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

By विकास राऊत | Published: July 27, 2023 12:42 PM

काही ऑइल कंपन्या यासाठी इच्छुक असून, एमआयडीसीने जागा दिल्यास डेपोचा प्रस्ताव मार्गी लागेल

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलचा (इंधन) डेपो उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संबंधित विभागांना सूचना दिल्या. काही ऑइल कंपन्या यासाठी इच्छुक असून, एमआयडीसीने जागा दिल्यास डेपोचा प्रस्ताव मार्गी लागेल, यावर सर्वंकष चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना सूचना दिल्या. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासह पर्यटन प्रकल्पांची कामे दर्जेदार होण्याकडे विशेष लक्ष देण्याचे आदेशही त्यांनी दिले.जिल्ह्यातील विविध विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील एका बैठकीत आढावा घेण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन उभारणीला गती द्या. शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांचे काम सुरू करावे. पैठण येथील जायकवाडी परिसरातील संत ज्ञानेश्वर उद्यान व संतपीठ उद्यान व तेथील परिसराचा विकास प्रादेशिक पर्यटन आराखड्यांतर्गत जलसंपदा विभागाने पूर्ण करावा. अजिंठा लेणी परिसरात सुमारे २३१ हेक्टरवर पर्यटनस्थळ साकारण्याच्या कामाला गती देणे. सिडकोने विमानतळासाठी जमिनी घेतल्या. शेतकऱ्यांनी त्या मोबदल्यात अतिरिक्त लाभाची मागणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

बैठकीस विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संदीपान भुमरे, पणनमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, यूडीचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, एच. के. गोविंदराज, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, ऊर्जा व उद्योग विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, ग्रामविकास प्रधान सचिव एकनाथ डवले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महापालिका प्रशासक जी. श्रीकांत उपस्थित होते. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय ऑनलाइन सहभागी होते.

फुलंब्रीत आयटीआय उभारणार...वैजापूर तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे कर्ज एकरकमी परतफेड करणे, शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बोजा कमी करून योजना जलसंपदा विभागाने ताब्यात घेणे. फुलंब्रीतील बायपास रस्ता परिसरात आयटीआय उभारणी, विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने संपादित केलेल्या जमिनीच्या भूसंपादनासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व इतर संबंधित यंत्रणांना कार्यवाहीचे आदेश दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेMarathwadaमराठवाडा