औरंगाबाद : पेट्रोलची किंमत बुधवारी ९८. ६३ रुपये प्रतिलिटरपर्यंत जाऊन पोहोचली. आता शंभरी गाठण्यासाठी केवळ १ रुपया १७ पैसे दूर आहे.
मात्र, पॉवर पेट्रोलने १७ फेबुवारी रोजीच शंभरी गाठली होती. त्यामुळे लवकरच साधे पेट्रोल शतक पूर्ण करणार अशी मानसिकता सर्वांनी करून ठेवली होती. मात्र, ५ राज्यांच्या निवडणुकांमुळे भाववाढ टळली, असेच म्हणावे लागेल. बुधवारी शहरात पॉवर पेट्रोल १०२ रुपये १० पैसे प्रतिलिटर विक्री झाले. म्हणजे, मागील अडीच महिन्यांत हे पेट्रोल लिटरमागे दीड रुपयांनी महागले. साधे पेट्रोल फेब्रुवारीत ९७.१३ पैसे विकल्या गेले. तेव्हापासून आतापर्यंत दीड रुपयांची वाढ झाल्याचे पेट्रोलपंपमालक हितेश पटेल यांनी सांगितले.
आता वाहनधारक पेट्रोलची किंमत विचारतच नाही. १०० रुपयांची नोट देतात व जेवढे पेट्रोल येईल तेवढे टाका असे म्हणतात, असे पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी सांगितले.