फुलंब्री नगर पंचायत पोटनिवडणुकीत दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 07:29 PM2021-12-22T19:29:41+5:302021-12-22T19:31:35+5:30

या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे गेल्या असल्या तरी नगर पंचायतमध्ये भाजपची सत्ता असून त्यांना अडचण येणार नाही.

In Fulambri Nagar Panchayat by-election, both the seats are in the lead of Mahavikas | फुलंब्री नगर पंचायत पोटनिवडणुकीत दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे

फुलंब्री नगर पंचायत पोटनिवडणुकीत दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे

googlenewsNext

फुलंब्री : येथील नगर पंचायतच्या दोन जागे करिता झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारत दोन्ही जागांवर विजय मिळविला आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार तर केवळ दोन मतांनी निवडून आला आहे. 

फुलंब्री नगर पंचायत च्या वार्ड ८ व वार्ड २ मधील नगरसेवकाचे पद शासकीय जमिनीवर अतिक्रमणामुळे रद्द झालेले होते. या दोन जागेवर मंगळवारी मतदान झाले तर आज बुधवारी मतमोजणी झाली. वार्ड ८ मधून अर्चना उमेश दुतोंडे या ४३४ मतदान घेऊन विजयी झाल्या त्यांनी भाजपच्या रुपाली बनसोडे यांचा १४४ मतांनी पराभव केला. दुसरीकडे वार्ड २ मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पूजा आनंदा ढोके ह्या केवळ २ मतांनी विजयी झाल्या त्यांनी भाजपच्या विमल ढोके यांना पराभूत केला. पूजा ढोके यांना २७९ तर विमल ढोके यांना २७७ मते पडली आहे 

तहसील कार्यालयात निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विजय जल्लोष करीत मिरवणूक काढली यात तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात अजगर पटेल,राजेंद्र ठोंबरे ,चंद्रकांत जाधव,महेमूद पटेल,आनंदा ढोके ,राउफ कुरेशी,जमीर पठाण,मुद्दसर पटेल,कैसर पटेल,फेरोज खान ,उत्तम ढोके ,फय्याज पटेल,रमेश दुतोंडे ,हरिदास घरमोडे,काशीनात मिसाळ ,हाफिज मन्सुरी ,रिजवान खान आदीचा समावेश आहे 

नगर पंचायत आहे भाजपाकडे 
भाजप नगराध्यक्ष सुहास सिरसाठ यांच्यासह ९ नगरसेवक आहेत. यात एक नगरसेवक एमआयएमचा आहे  तर आता महाविकास आघाडीकडे ७ नगरसेवक झालेले आहे. या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे गेल्या असल्या तरी भाजपला काहीही अडचण येणार नाही. 
 

Web Title: In Fulambri Nagar Panchayat by-election, both the seats are in the lead of Mahavikas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.