सोयाबीन तुर व उसाच्या क्षेत्रात झाली वाढ
फुलंब्री : तालुक्यात मृग नक्षत्रात पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांनी लगेच खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली. आतापर्यंत ७० ते ८० टक्के पेरणी आटोपली असून यात मका व कपाशीचे क्षेत्र कमी होऊन सोयाबीन, तूर व उसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
फुलंब्री तालुक्यात खरीप पिकाचे क्षेत्र ५८ हजार ५०० हेक्टर आहे, तर प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र ५३ हजार ९५८ इतके आहे. शेतकऱ्यांनी यंदा नांगरणी केल्यानंतर शेणखत टाकून शेतकरी रोटाचा वापर केला. जमीन भुसभुशीत करून ठेवली होती. बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतीची मशागत केली. तालुक्यातील यंदा मका व कपाशी पिकाचे क्षेत्र कमी करून सोयाबीन, तूर, ऊस या पिकाला अधिकाधिक महत्त्व दिले आहे, तर अद्रकचे लागवड क्षेत्र यंदा आहे त्या स्थितीत आहे.
खरिपाचे क्षेत्र
तालुक्यात खरिपाचे क्षेत्र : ५३,९५८ हेक्टर
कपाशी : २३,६०० पैकी प्रत्यक्ष लागवड १६ हजार हेक्टर.
मका : १४,६०० पैकी ९,९०० हेक्टरवर लागवड.
बाजरी : ६००० हजारपैकी १५०० हेक्टरवर लागवड
तूर : ४२०० हजारपैकी १९०० हेक्टर
अद्रक : १,६५८ हजार.
मूग : २२८ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड.
ऊस : १२०० हेक्टरवर लागवड.
सोयाबीन : ५०० हेक्टरपैकी २५०० हेक्टरवर लागवड.
तालुक्यात एकूण खरिपाच्या ५३ हजार क्षेत्रापैकी ३२ हजार ८३४ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड झाली आहे या लागवडीचा वेग पाहता, येत्या सहा ते सात दिवसात शंभर टक्के खरीप पिकाची लागवड होण्याची शक्यता आहे.
--
सोयाबीन, तूर व उसाचे क्षेत्र वाढले
तालुक्यातील धरणे, नदीकाठी असलेल्या फुलंब्री, सांजूळ, बिल्डा, पाल, कान्होरी, म्हसला, पाथ्री, वाकोद या गाव परिसरात विहिरीला पाणी मुबलक असल्याने येथे शेतकऱ्यांनी अद्रक व उसाची लागवड केलेली आहे. या लागवडीला १५ मेपासून सुरुवात करण्यात आली. यंदा शेतकऱ्यांनी मृगाच्या पावसानंतर सोयाबीन, तूर व उसाला पसंती दिली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.