सिल्लोड (औरंगाबाद) : मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांसाठी कॉंग्रेसतर्फे तहसील कार्यालयासमोर सरकार विरोधी तीव्र निदर्शने करण्यात आली.
तब्बल चार तास चाललेल्या निदर्शनात आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणा देत मराठा, मुस्लिम, धनगर, कोळी समाजाच्या आरक्षण व इतर मागण्यांची सरकारने पूर्तता करावी अशी मागणी केली. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजप सरकारची आरक्षण देण्याची इच्छा दिसत नसल्याचे त्यांच्या वर्तनातून दिसत असल्याचा आरोप केला. यानंतर आंदोलकांनी तहसीलदार संतोष गोरड यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
आंदोलनात कॉंग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशव तायडे, जि. प. माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, नगराध्यक्ष अब्दुल समीर, तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, प्रभाकर आबा काळे, प्रदेश प्रतिनिधी रविंद्र काळे, विक्रांत दौड, शहराध्यक्ष प्रा.मन्सूर कादरी, बाबासाहेब तायडे, हरीभाऊ राठोड, सोयगाव पंस सभापती धरमसिंग चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, अशोक सुर्यवंशी, महिला काँग्रेसच्या दुर्गाबाई पवार, सिमाताई गव्हाणे, कुशिवर्ताबाई बडक, शकुंतलाबाई बन्सोड आदींची उपस्थिती होती.