औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तर उजव्या कालव्यातूनही पाच क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. सध्या जायकवाडीतून माजलगाव धरणात तसेच परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी खडका बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येत आहे. माजलगाव धरणात उजव्या कालव्याद्वारे तर खडका बंधाऱ्यासाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. सुरुवातीला डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यातून प्रत्येकी तीनशे क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत होते. परंतु हळूहळू हा विसर्ग वाढविण्यात आला आहे. डाव्या कालव्यातून सध्या सातशे क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत असून, उजव्या कालव्यातूनही ५०० क्युसेक्सने पाणी सोडणे सुरू आहे. उजव्या कालव्याद्वारे सोडलेले पाणी माजलगाव धरणात दाखल झाले आहे. माजलगाव धरणात एकूण साडेचार टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. तर परळीच्या औष्णिक केंद्रासाठी १७ दलघमी पाणी सोडले जाणार आहे.
डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने विसर्ग
By admin | Published: September 12, 2016 11:19 PM