लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्टसिटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्हीवर (स्पेशल पर्पज व्हेकल) पूर्णवेळ काम पाहण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयाची (सीईओ) लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचा संबंधित अधिकारी प्रतिनियुक्तीने नेमण्यात येईल. असे एसपीव्हीचे चेअरमन तथा उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.मुंबईला स्मार्टसिटीसाठी होणाºया बैठकींमुळे वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे सीईओची नियुक्ती झाल्यानंतर कामाला गती प्राप्त होईल, तसेच दर तीन महिन्याला आढावा घेण्यापेक्षा दरमहा बैठक घेणे सोपे होणार आहे. गुरुवारच्या बैठकीत पॅन सिटी प्रकारात करावयाच्या काही कामांबाबत निर्णय घेण्यात आले.एलईडी पथदिव्यांबाबत आणि घनकचरा डेपोप्रकरणी अभ्यास करावा लागेल. स्मार्टसिटीत घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्पही उभारला जाईल. त्यासाठी पुढील बैठकीत डीपीआर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रीनफिल्ड चिकलठाणा येथे करण्याचे ठरले असून, त्याच्या मॉडेलबाबत चर्चा झाली. त्याच्या मास्टर प्लॅनसाठी कन्सल्टंट नेमण्यात येणार आहे, असे पोरवाल म्हणाले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे स्मार्टसिटीच्या कामकाजाप्रकरणी आढावा बैठक झाली. बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेता विकास जैन, भाऊसाहेब जगताप, प्रमोद राठोड, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम, संचालक भास्कर मुंडे, पोलीस आयुक्त यशस्वी यादव, एस. डी. पानझडे, सिकंदर अली आदींची उपस्थिती होती.
स्मार्टसिटीसाठी पूर्णवेळ ‘सीईओ’ नियुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 1:17 AM