शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

‘फ्युचर मेकर’ कंपनीमुळे ‘फ्युचर’आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 7:47 PM

गुंतवणूकदारांची  १३ लाख ३१ हजारांची फसवणूक

ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीमोठा परताव्याचे  आमिष

औरंगाबाद : साडेसात लाख रुपये गुंतवा तसेच इतरांनाही गुंतवणूक करायला लावून जास्तीत जास्त परतावा आणि इतर फायदे मिळवा, असे आमिष दाखवून हरियाणामधील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा. लि. कंपनीने औरंगाबादेतील अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. प्राथमिक स्तरावर कंपनीने १३ लाख ३१ हजार ६३९ रुपयांची फसवणूक केल्याची पाच जणांनी तक्रार नोंदविली आहे. 

कंपनीचे संचालक राधेश्याम, बन्सीलाल, जयराम शिंदे, संजय घुले अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हरियाणातील हिस्सारमधील फ्युचर मेकर लाईफ केअर कंपनीचे एजंट जगन्नाथ घुले आणि प्रदीप पराड यांनी तक्रारदार रामेश्वर रघुनाथ रोकडे (रा. गजानननगर) यांना सिडकोतील कंपनीच्या कार्यालयात नेले. तेथे कंपनीचे संचालक संजय घुले आणि जयराम शिंदे यांची भेट झाली. कंपनीने जून २०१८ मध्ये बीड बायपासवरील एका हॉटेलमध्ये घेतलेल्या सेमिनारला रामेश्वर हे हजर होते. त्याच महिन्यात सिडकोतील एका मंगल कार्यालयात आणि जुलैमध्ये एका नाट्यगृहात कंपनीने सेमिनार घेतले. साडेसात हजार रुपये गुंतवणूक क रून आयडी घेतल्यास कृषी उत्पादने, आयुर्वेद उत्पादने तसेच अडीच हजार रुपये कमिशन स्वरूपात मिळते, असे सांगितले. शिवाय जास्तीत जास्त आयडी देणाऱ्यांना कंपनीत विविध प्रकारचा रँक मिळतो. प्रत्येक रँकवरील आयडीधारकास वेगवेगळे लाभ कंपनी देते असे सांगितले.  

कंपनीने त्यांना कमिशनपोटी ४३ हजार १४२ रुपये दोन टप्प्यात बँकेत जमा केले. मात्र त्यांना कृषी आणि आयुर्वेद उत्पादने दिली नाही. त्यांच्याप्रमाणेच परवेज मोहंमद यांनी ३ लाख ३७ हजार ५०० रुपये, सुनील सुभाष मेहत्रे यांनी २ लाख ३२ हजार ५०० रुपये, प्रमोद साळवे यांनी १ लाख ९ हजार १३९ रुपये तर अप्पासाहेब तुपे यांनी साडेचार लाख रुपये कंपनीत गुंतविले. रोकडे यांच्याप्रमाणे अन्य या गुंतवणूकदारांनाही कंपनीने लाभ दिले नाही. एवढेच नव्हे तर त्यांची मुद्दलही परत केली नाही. कंपनीने आपली फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात येताच सर्वांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. 

अगोदर दिली बक्षिसे गुंतवणूदार आकर्षितकंपनीने विविध लोकांना कार दिल्याचे तसेच त्यांना कंपनीने लाखो रुपये कमिशनपोटी दिल्याचे बँक स्टेटमेंट या कार्यक्रमात दाखविण्यात आले. कंपनीच्या संचालकांनी मोठा परतावा आणि इतर लाभ देण्याचे आश्वासन दिल्याने रोकडे यांनी कंपनीत २ लाख २ हजार ५०० रुपये गुंतवणूक करून २७ आयडी खरेदी केल्या.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस