लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आज आपल्यासमोर करिअरचे अनेक पर्याय आहेत. यामधून आपला कल लक्षात घेऊन उत्तम पर्याय कसा निवडायचा हे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ आणि व्हीआयटी युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फ्युचर मंत्रा या कार्यक्रमातून जाणले आणि सर्वच विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी एक नवा आत्मविश्वास मिळाला.रविवार, दि. १२ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे लोकमत आणि व्हीआयटी आयोजित ‘फ्युचर मंत्रा’ कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भूपेश दवे, प्रा. डॉ. विनोदकुमार शर्मा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर दवे आणि प्रा. डॉ. शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.संपूर्ण शिक्षण हा जवळपास २२ ते ३० वर्षांचा सोहळा आहे. हा सोहळा साजरा करण्यासाठी सुरुवातीपासूनच कसून तयारी करा. आज स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर तुम्हाला सगळ्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. यासाठी अगदी सुरुवातीपासून तुमचे ध्येय निश्चित करा, तुमच्या आवडी निवडी जाणून घ्या. स्वत:वर विश्वास ठेवा, अशा शब्दांत दवे यांनी मुलांना नवी प्रेरणा दिली.यानंतर दुस-या सत्रात प्रा. डॉ. शर्मा यांनी विद्यार्थ्यांना चैन्नई, वेल्लोर, भोपाळ आणि आंध्र प्रदेशात असणा-या व्हीआयटी युनिव्हर्सिटीबाबत सविस्तर माहिती दिली.विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देण्याचा व्हीआयटीचा प्रयत्न असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भव्य कॅम्पस, सुसज्ज वर्गखोल्या, कॅम्पस मुलाखतींद्वारे विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत मिळणा-या संधी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, व्हीआयटीच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे आज अनेक परदेशी विद्यार्थी तेथे शिक्षण घेत असून, तुम्हीही उत्तम करिअर घडविण्यासाठी व्हीआयटीची मदत घ्या, अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सेमिनारमुळे करिअरचे अनेक पर्याय समजले, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.
‘फ्युचर मंत्रा’ ने दिला नवा आत्मविश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:30 AM