लासूर स्टेशन : केंद्र सरकारने शेतमाल विक्री मार्केटबाहेरदेखील करू शकता, असा नियम लागू केल्याने मका, सोयाबीन आदी भुसार मालाची बाजारपेठेत आवक कमी होऊ लागली आहे. तसेच परराज्यात कापूस भरून जाणाऱ्या ट्रकचा शेअर्स मिळत नसल्यामुळे बाजार समितीचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे बाजार समितीचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे बाजार समित्यांचे भवितव्य अंधारात आले आहे.
बाजार समितीच्या वतीने भुसारामध्ये लिलावात चढाओढ होत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत होते. त्यामुळे बाजार समितीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागांतून शेतकरी माल विक्रीसाठी लासूर स्टेशन येथील बाजारपेठेत येतात. त्यावर संपूर्ण बाजारपेठेचे गणित अवलंबून आहे. दरवर्षी परराज्यात कापूस विक्रीसाठी जाणाऱ्या ट्रकचा शेअर्स मिळतो. गेल्या वर्षात तब्बल साठ लाख रुपये उत्पन्न बाजारपेठेला मिळाले होते; परंतु केंद्र सरकारने शेतीमाल नियमनमुक्त केल्याने मका आदी भुसार माल बाजार समितीच्या बाहेर विक्री होत आहे. यामुळे बाजार समितीत आवक घटली. बाजार समितीच्या यार्डातील व्यापारी अडचणीत आले. शेकडो हमाल कष्टकऱ्यांना अपेक्षित रोजंदारी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे यंदा परराज्यात कापूस ट्रक भरून जाणाऱ्या ट्रकचे शेअर्स मिळाले नाही. परिणामी बाजार समितीचे उत्पन्न घटले आहे. बाजार समितीचे भवितव्य धोक्यात आले आहे.
---------------
डिसेंबर २०१९ :
मका ४६ हजार, ४३१ क्विंटल आवक
मका भाव जास्तीत जास्त : १९२०
कमीत कमी किंमत : १७००
सरासरी : १६७५
-------------
डिसेंबर २0२0
मका : मका १४ हजार २५८ आवक
मका जास्तीत जास्त भाव : १३००
कमीत कमी : ११००
सरासरी : १२५०
-----------
फोटो : बाजार समितीचा फोटो कमानीचा लोगो आहे