लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) या पूर्व परीक्षेमध्ये चुकीच्या दोन प्रश्नांची उत्तरे दुरुस्त करून दहा गुणांची वाढ केल्याचे शपथपत्र औरंगाबाद खंडपीठात सादर केले़या निर्णयामुळे जी-पीएटी परीक्षा देणाºया देशभरातील सुमारे एक हजार पाचशे विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार असून, त्यांना १५ हजारांचे विद्यावेतनदेखील मिळणार आहे़ न्या़ आऱ एम़ बोर्डे आणि न्या़ ए़ एम़ ढवळे यांच्या खंडपीठासमोर प्रकरणाची सुनावणी झाली असता दाखल झालेल्या शपथपत्रावरून खंडपीठाने याचिका निकाली काढली़पदव्युत्तर औषधनिर्माणशास्त्र (एम़ फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आॅल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) यांनी ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टिट्यूड टेस्ट (जी-पीएटी) ही आॅनलाइन परीक्षा केंद्र शासनाच्या मानवसंसाधन मंत्रालयामार्फ त (एचआरडी) २८ व २९ जानेवारी रोजी घेण्यात आली होती़ नंतर परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आली़ या उत्तरतालिकेत ८ प्रश्नांची उत्तरे चुकीची दिली गेली़ त्यामुळे याचिकाकर्त्याने याबाबत केंद्र्र शासनाकडे तक्रार नोंदविली, तसेच चुकीची उत्तरे दिल्याबाबत पुस्तकांचे पुरावे दाखल के ले; मात्र शासनाने तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही़ या नाराजीने नांदेड येथील दयानंद संभाजीराव मांजरमकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली़ याचिकेत, तज्ज्ञांचे विशेष पथक नेमावे, अशी विनंती के ली होती़ त्यानुसार तज्ज्ञांची समिती नेमून तपासणी केली असता दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची असल्याचे समोर आले़ त्या चुकीच्या प्रश्नांचे दहा गुण विद्यार्थ्यांना वाढवून दिल्याचे शपथपत्र एआयसीटीईने खंडपीठात सादर केले़ याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी काम पाहिले, तर एआयसीटीईच्या वतीने अॅड. श्रीकांत अदवंत यांनी काम पाहिले़
जी-पीएटीच्या परीक्षार्थींना मिळणार प्रत्येकी दहा वाढीव गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:41 AM