औरंगाबाद : बीड बायपास रस्त्यावरील संग्रामनगर उड्डाणपूल संपल्यानंतर असलेल्या एका वाईन शॉपच्या चौथ्या मजल्यावर तीन टेबलवर तीन दिवसांपूर्वी एकाने जुगार अड्डा सुरू केला होता. याची कुणकुण सातारा पोलिसांना लागल्यानंतर बुधवारी रात्री छापा मारला. यात एका माजी नगरसेवकासह तब्बल २३ जणांना पकडत त्यांच्याकडून १ लाख ७३ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सातारा ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी दिली.
सातारा ठाण्यातील विशेष पथकाचे उपनिरीक्षक देविदास शेवाळे, हवालदार कारभारी नलावडे, अरविंद चव्हाण, सुनील धुळे आणि युवराज क्षीरसागर हे हद्दीमध्ये गस्त घालीत असताना जबिंदा लॉन्सच्या जवळ लक्की वाईन शॉपच्या वर चौथ्या मजल्यावर हॉलमध्ये झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती निरीक्षक माळाळे यांना कळविल्यानंतर संबंधित ठिकाणी पथकाने छापा मारला.
यामध्ये टेबल क्रमांक एकवर धनंजय बबन इंगळे (रा. गारखेडा परिसर), शेख अनिस शेख अहेमद (रा. जहागीरदार कॉलनी), शेख फिरोज शेख युसूफ (रा. उस्मानपुरा), अब्दुल साजिद अब्दुल रहीम, जावेद खान नवाब खान, शेख शफिक शेख अब्बास, शेख अमजद शेख गौस (चौघे, रा. सादातनगर), अमोल काशीनाथ केंद्रे (रा. एकनाथनगर, उस्मानपुरा), सुजित दत्ता हानवते (रा. राजनगर, मुकुंदवाडी), टेबल क्रमांक दोनवर दत्तू गणपत इंगोले (रा. गल्ली नंबर ४, इंदिरानगर, गारखेडा), कमलेश कांतीलाल मंडोरे (रा. विजयनगर), दिनेश लवकुश जाधव (रा. जवाहरन कॉलनी), अतुल नामदेव कोळी (रा. पुंडलिकनगर), मोहम्मद खुरखान मोहम्मद इस्माईल (रा. राहुलनगर, गल्ली नंबर ५), विकास गिरीधर राठोड ( रा. म्हाडा कॉलनी, देवळाई), शेख महेमुद शेख इस्माईल (रा. देवळाई तांडा), टेबल क्रमांक तीनवर बाळासाहेब दादाराव दाभाडे (रा. भानुदासनगर), अर्जुन गाेवर्धन राजपूत, जावेद समद पठाण (दाेघे, रा. चितेगाव, ता. पैठण), माजी नगरसेवक मोहम्मद नावेद अब्दुल रशीद (रा. सादातनगर) आणि मच्छिंद्र संपतराव बनकर (रा. अरिहंतनगर, जवाहर कॉलनी) यांना खेळताना पकडण्यात आले.
जुगार अड्ड्याचा मास्टरमाईंडजुगार खेळताना २१ जणांना पकडण्यात आले. उत्तम खंडूजी कांबळे (रा. उत्तमनगर, जवाहर कॉलनी) आणि मणिराम उदयराम चव्हाण (रा. न्यू हनुमाननगर) हे दोघे काऊंटरवर बसून पैसे जमा करीत होते. उत्तम कांबळे हा जुगार अड्डा चालवित होता. त्याला यापूर्वीही जुगार अड्डा चालविताना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत पकडले होते. याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे.
सातारा ठाण्यात मध्यरात्री गर्दीजुगार खेळताना २१ आणि इतर दोघे असे २३ जणांना पकडले. या प्रत्येकाचे नातेवाईक, मित्र गुन्ह्यातून सोडविण्यासाठी सातारा ठाण्यात मध्यरात्री जमा झाले होते. अनेकांची फोनाफोनी सुरू होती. मात्र, पोलिसांनी कारवाई पूर्ण केल्यानंतरच संबंधितांना नोटीस देऊन सोडले. याप्रकरणी मनोज अकोले यांच्या तक्रारीवरून २३ जणांवर गुन्हा दाखल केला.