शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

जालन्यातही तयार होत आहेत उंच गणेश मूर्ती

By admin | Published: August 10, 2014 11:56 PM

शहरातील हरहुन्नरी कलावंतांनी दहा ते पंधरा फूट उंच गणेश मूर्ती तयार करण्याचे आव्हान लिलाया पेलले आहे.

जालना: शहरातील स्थानिक कलावंतांनीही आता कात टाकण्यास सुरुवात केली आहे. एरव्ही उंच गणेश मूर्ती म्हटले की, गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नगर, पुणे, बऱ्हानपूर गाठावे लागत. आता मात्र शहरातील हरहुन्नरी कलावंतांनी दहा ते पंधरा फूट उंच गणेश मूर्ती तयार करण्याचे आव्हान लिलाया पेलले आहे. गणेश मंडळांची मोठ्या तसेच आकर्षक मूर्तींची मागणी असते. ही मागणी स्थानिक पातळीवर पूर्ण होत नसल्याने बाहेरगावाशिवाय पर्याय नव्हता. येथील अनेक मूर्तीकारांनी मोठ्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. त्यापैकी तरुण मूर्तीकार किशोर संत्रे यांनी दहा ते पंधरा फुट उंचीच्या विविध आकारातील तसेच रुपे असलेल्या मूर्ती तयार केल्या आहेत. गणेश मंडळांच्या मागणीमुळे आम्ही मोठ्या मूर्ती तयार करीत असल्याचे ते सांगतात. अधिक माहिती देताना संत्रे म्हणाले की,यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गणेश मूर्तींच्या किंमती काहीअंशी वाढल्या आहेत. त्याचबरोबर मंदीचाही फटका बसण्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. यावर्षी दहा ते पंधरा फूटउंचीच्या ७० ते ८० गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. काही मूर्तींचे काम पूर्ण झाले आहे. काही मूर्तींवर अंतिम हात फिरविणे बाकी असल्याचे सांगितले. उंच गणेश मूर्ती करताना आकार तसेच मूर्ती भंगणार याची पुरेपूर दक्षता घेऊन मूर्ती करावी लागते. गतवर्षीही आम्ही काही प्रमाणात उंच गणेश मूर्ती तयार केल्या होत्या. ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत मूर्तींच्या किंमती असल्याचे संत्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.उंच गणेश मूर्तीमध्ये प्रामुख्याने लालबागचा राजा, जयमल्हार, चिंचपोकळीचा राजा, तुतारीवर तसेच तबल्यावरचा गणेश, दगडूशेठ, चंद्रावर विराजमान असलेला या गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यंदा गणेशोत्सव लवकर आल्याने बाजारात मूर्त्यांची आवक कमी आहे. (प्रतिनिधी)