- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : चिकलठाण्यात भव्यदिव्य सुवर्णमंदिर उभारले जात आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. अहो, भारतीयांचे श्रद्धास्थान असलेले अमृतसर येथील सुवर्णमंदीराची प्रतिकृती येथे बनविली जात आहे. एक एकर जागेवर ३५ फूट उंचीच्या मंदिराचे दर्शन नागरिकांना गणेशोत्सवात घेता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, औरंगाबादच्यागणेशोत्सवाच्या आजपर्यंतच्या इतिहासातीलही पहिलीच सुवर्णमंदीराची भव्य प्रतिकृती ठरणार आहे.
औरंगाबाद शहराचा एक भाग असूनही चिकलठाणा गावाने आपले ग्रामीणपण जपले आहे. या गावाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे ‘सजीव देखावे’ होय. याच गणेशोत्सवात मागील ३८ वर्षांपासून येथील ‘सावता गणेश मंडळाने’ सजीव देखाव्याची परंपरा अबादित ठेवली आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे यात खंड पडला. मात्र, यंदा ‘सुवर्ण मंदीर’ उभारत यामंडळाने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.
शीख धर्मीयांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ हे अमृतसरमधील सुवर्णमंदीर आहे. तेच जगभरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. १६ व्या शतकात हे मंदिर उभारण्यात आले आहे. चिकलठाण्यात उभारण्यात येत असलेल्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृतीत एक मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याची उंची ३० फूट आहे. सुवर्णमंदिरात जसे ‘अमृत तलाव’ आहे. तसचा अमृत तलाव येथे तयार केला जात आहे. त्यात चोहीबाजूने पाणी असणार आहे. सुवर्णमंदिर जमीनीपासून कळसापर्यंत ३५ फुटाचे असेल. संपूर्ण मंदिरासाठी फायबर, लाकूड, प्लायवूड, कपड्यांचा वापर करण्यात येणार आहे. या मंदिरात शीख धर्मातील पहिले धर्मगुरु गुरु नानक देव यांच्यापासून सर्व १० धर्मगुरुंचे छायाचित्र असणार आहेत. त्यांचे सर्वांना दर्शन घेता येईल.मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्याबाजूस गणपतीची मोठी मूर्ती बसविण्यात येणार आहे. या देखाव्याची उभारणी सुरु असून गणेशोत्सवात ३ सप्टेंबरपासून सर्वांना हे सुवर्णमंदिर पाहाता येणार आहे.
पावित्रता पाळणारसुवर्णमंदिराची प्रतिकृती असली तरी त्याचे पावित्र पाळण्यात येणार आहे. मुख्यप्रवेशद्वाराच्या बाहेर चपला स्टँड असून तिथे स्वयंसेवक मोफत चपला सांभाळणार आहेत. प्रत्येकाला सुवर्णमंदिरात प्रवेश करण्या आधी हातपाय धुवावे लागणार आहे. त्याची खास व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येकाला डोक्यावर ‘शिरोपा’ बांधूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. लंगरच्या धर्तीवर येथे महाप्रसादाचे भाविकांना वाटप केले जाणार आहे.
शीखबांधवांच्या वेशभूषेतील स्वयंसेवकसावता गणेश मंडळाचे ३०० पेक्षा अधिक स्वयंसेवक आहेत. या सुवर्णमंदिराच्या देखाव्याचे व नियमाचे पालन करण्यासाठी स्वयंसेवकांना शिफ्टनुसार ड्युटी लावणार आहेत. हे सर्व स्वयंसेवक शीखबांधवांच्या वेशभूषेत असणार आहेत.