लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : गेल्या आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला गंगापूर सहकारी साखर कारखाना अखेर राज्य सहकारी बँकेने न्यायालयाच्या आदेशावरून ताब्यात घेतला. शेतकरी व सभासदांच्या कारखाना वाचविण्याच्या हालचालींना शेवटी विराम मिळाला.उच्च न्यायालयाने २२ डिसेंबर २०१७ रोजी दिलेल्या निर्णयानुसार पोलीस संरक्षणात गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा सोमवारी दुपारी १२ वाजता घेण्यात आला.यावेळी बंद कारखाना देखभाल करणाºया सुरक्षा रक्षकांना गेल्या पाच महिन्यांचा पगार मिळाला नाही. याबाबत दत्तूसिंग ठाकूर यांनी बँकेचे अधिकारी व कारखाना व्यवस्थापनाकडे पगाराची मागणी केली, मात्र त्यांना संबंधितांनी चर्चेअंती यावर तोडगा काढू असे सांगितले. दरम्यान, उपस्थित उस उत्पादकांनी बँकेच्या कर्मचाºयांना कारखान्याच्या प्रवेशद्वारावर रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना तात्काळ अटक केली होती. बँकेचे प्राधिकृत अधिकारी बी. एम. राठोड आणि त्यांच्या कर्मचाºयांच्या उपस्थितीत कारखान्याचे व्हा. चेअरमन लक्ष्मण भुसारे, कार्यकारी संचालक बी.एम.पाटील, संचालक राजेंद्र वाबळे, देवीदास वाघ, सुभाष साळुंके, कल्याण सुकासे, बाबासाहेब गायकवाड, राजेंद्र दारूंटे, तुकाराम मिसाळ, गोरखनाथ तुपलोंढे, नानासाहेब गायके, रामेश्वर मुंदडा, अशोक जगताप, शेषराव जाधव, कारखाना कर्मचारी युनियनचे महेमूद पटेल, पांडुरंग कोंडूळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना स्थळावर ताबा प्रक्रियेचा पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यावर वरील सर्व संचालकांनी स्वाक्षरी करून कारखान्याचा ताबा सोडला.
गंगापूर साखर कारखाना अखेर बँकेच्या ताब्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:29 PM