शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

वडगाव-बजाजनगरात गँगवॉर उफाळले; सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून करून मारेकरी पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 2:13 PM

बजाजनगरातील हॉटेल मृगनयनीसमोर शुक्रवारी १० वाजेच्या सुमारास एका तरुणास दोन अनोळखी व्यक्ती मारहाण करीत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली.

ठळक मुद्देवडगाव- बजाजनगरात वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून गेल्या काही वर्षांपासून दोन गटांत सतत वादमयत विशाल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे ७ ते ८ गुन्हे दाखल

वाळूज महानगर : वडगाव- बजाजनगरात पुन्हा गँगवॉर उफाळले असून, २७ वर्षीय सराईत गुन्हेगाराचा अज्ञात मारेकऱ्यांनी दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी गुन्हेगाराची ओळख पटली असून, त्याचे नाव विशाल ऊर्फ मड्ड्या किशोर फाटे (रा. वडगाव) असे असून, तो वडगावात गतवर्षी योगेश प्रधान या तरुणाच्या खूृन प्रकरणातील आरोपी आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगरातील हॉटेल मृगनयनीसमोर शुक्रवारी १० वाजेच्या सुमारास एका तरुणास दोन अनोळखी व्यक्ती मारहाण करीत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी एक अनोळखी तरुण रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी बेशुद्ध पडलेला असल्याचे, तसेच दगडाने त्याचा चेहरा ठेसलेला असल्याचे पोलिसांना दिसून आले. गंभीर जखमी अवस्थेत त्या अनोळखी तरुणास पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले.

फाटे हा सराईत गुन्हेगारबजाजनगरात दगडाने ठेचून खूृन केलेल्या मयत तरुणाची ओळख पटली असून, त्याचे नाव विशाल ऊर्फ मड्ड्या किशोर फाटे (२७, रा. वडगाव कोल्हाटी), असे आहे. मयत विशाल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात जवळपास गंभीर स्वरूपाचे ७ ते ८ गुन्हे दाखल आहेत. गतवर्षी वडगावातील योगेश प्रधान या तरुणाच्या खून प्रकरणातही विशालचा सहभाग होता. या खूृन प्रकरणात विशाल हा वर्षभर हर्सूल कारागृहात होता. पंधरा दिवसांपूृर्वीच विशाल याची जामिनावर सुटका झाल्याने तो घरी परतला होता.

गँगवारचा वाद पुन्हा उफाळलावडगाव- बजाजनगरात वर्चस्व प्रस्थापित करण्यावरून गेल्या काही वर्षांपासून दोन गटांत सतत वादविवादाच्या घटना घडत आहेत. गतवर्षी १७ मे रोजी योगेश प्रधान या तरुणाचा चौघा आरोपींनी चाकूने वार करून, तसेच दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणातील जितेंद्र दहातोंडे, विकास गायकवाड, करण साळे व विशाल फाटे या चौघा आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. योगेश प्रधान याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जामिनावर सुटलेल्या विशाल फाटे याचा मयत योगेश प्रधान याच्या साथीदारांनी दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी