शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ब्रिटिशांनंतर पहिल्यांदाच सरकार पाहतंय गावठाण; ड्रोनच्या सहाय्याने सुरू आहे पथदर्शी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 7:36 PM

सर्व्हे ऑफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे गावठाण मिळकतींची पाहणी केली जात आहे.

- विकास राऊतऔरंगाबाद : ब्रिटिश राजवटीत राज्यातील गावठाणांची पाहणी करण्यात आली होती. ब्रिटिशांनी भारत सोडल्यानंतर पहिल्यांदाच सरकार गावठाणांची पाहणी करून हद्द ठरवीत आहे. राज्यात पुणे व औरंगाबाद जिल्ह्यांत हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. औरंगाबादेतील १ हजार ८२ गावांतील गावठाणांची आधुनिक ड्रोनच्या साहाय्याने होत असलेली पाहणी अंतिम टप्प्यात आहे.

सर्व्हे ऑफ इंडियामार्फत ड्रोनद्वारे गावठाण मिळकतींची पाहणी केली जात आहे. जीआयएस (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) नुसार ड्रोनने पाहणी केलेल्या प्रतिमा क्युबेतून एकमेकांना जोडल्या आहेत. त्या प्रतिमा पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. त्यानंतर तयार होणारे गावठाणाचे नकाशे ग्रामपंचायत, सरपंचांना सादर केले जातील.

ड्रोनच्या पाहणीत गावठाणाची मूळ हद्द, सद्यस्थिती, अतिक्रमण, वाढीव बांधकामांसह हद्द निश्चित करण्यात येत आहे. नमुना ८ (अ) नुसार चौकशी अधिकारी गावठाणांच्या माहितीची पडताळणी करीत आहेत. यासाठी ७० ते ८० जणांचे पथक तयार केले असून, एका दिवसात पाच गावांची पाहणी करण्यात आली आहे. राज्यातील ३९ हजार ७३३ गावांतील गावठाणांची पाहणी होत आहे. त्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभागाला ७६ कोटी, तर भूमी अभिलेख संकलनासाठी लागणाऱ्या यंत्रणेवर २९८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गावठाण मालमत्तांचे जीआयएस रेखांकन करणे, प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे, खुली जागा व रस्त्याचा नकाशा तयार करणे, घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक देणे, ग्रामपंचायतीचे व शासनाचे ॲसेट रजिस्टर तयार करण्याचा या प्रकल्पात समावेश आहे.

८५३ गावांत दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या१९६४ मध्ये शासनाने राज्यातील गावठाणांना सर्व्हे क्रमांक दिले होते, त्याला ब्रिटिशांनी केलेल्या पाहणीचा आधार होता. त्यानंतर दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांना नगर भूमापन क्रमांक देण्यात आले. राज्यातील ४० हजार गावांपैकी ४ हजार ६७९ गावांंची ९४ पर्यंत पाहणी केली. त्यानंतर तालुका पॅटर्न आले. जिल्ह्यात ८५३ गावांत दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे.

मालकी हक्काचे वाद संपतीलआतापर्यंत नऊ तालुक्यांतील १००३ गावांत मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अनेकांना मालमत्तांचे मालकी पत्रक वाटपही केले आहेत. प्लॉट, जमिनींच्या हद्दीचा वाद संपुष्टात येणार असल्याचा दावा भूमी अभिलेख जिल्हा उपधीक्षक दुष्यंत कोळी यांनी केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद