शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

‘गरज सरो, वैद्य मरो...’; आधी कोरोनायोद्धा म्हणून गौरव; नंतर दाखविला घरचा रस्ता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 1:55 PM

कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस-आयटक, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जोरदार निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्दे घाटीतील शंभरावर कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरचा रस्तावर्षभर काम करून घेतल्यानंतर काढून टाकले.

औरंगाबाद : ‘गरज सरो वैद्य मरो’ याची प्रचिती कोरोना योद्धे कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाहून येते. कोरोना रुग्ण घटताच घाटीतील शंभरावर कंत्राटी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. कोरोनाकाळात रुग्णसेवेचे पडेल ते काम केले. प्रशासनाने कोरोनायोद्धा म्हणून कामाचे कौतुक केले व कामावरून काढून टाकले. कुटुंबीयांची जबाबदारी खांद्यावर आहे, पण आता चार घरांत धुणी-भांड्यांची कामेही मिळत नसल्याचे या बेरोजगार महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढल्याच्या निषेधार्थ ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस-आयटक, महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी ॲड. अभय टाकसाळ, गजानन खंदारे, महेंद्र मिसाळ, आनंद सुरडकर, आरेफ सय्यद, रवींद्र गायकवाड, चारुशीला जावळे, शकीला बेगम सय्यद शौकत, शीलाबाई मुजमुले आदींसह मोठ्यासंख्येने कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे म्हणाले, कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढण्यात आले. कोरोनापूर्वीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढलेले नाही.

तोंडाचा घास काढून घेतलाशकीला बेगम सय्यद शौकत म्हणाल्या, कुटुंबातील पाच जणांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. पण वर्षभर काम करून घेतल्यानंतर काढून टाकले. शीलाबाई मुजमुले म्हणाल्या, कोरोना काळात कामाबद्दल कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तिपत्र दिले आणि आता तोंडाचा घास काढून घेण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी