लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आमखास मैदानाच्या जवळील अण्णाभाऊ साठे वसतिगृहातील विविध खोल्यांमध्ये महापालिकेने मागील दोन महिन्यांपासून सुका कचरा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. दररोज रात्री या कचऱ्याला आग लावण्याचे काम करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहाला कच-याचे डम्पिंग यार्ड बनविण्यात आल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे.मातंग, मागासवर्गीय गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना राहण्याची सोय व्हावी या उदात्त हेतूने आमखास मैदानाजवळ भव्य वसतिगृह उभारण्यात आले. १९९९ मध्ये या वसतिगृहाचे प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. येथे राहणाºया विद्यार्थ्यांना कोणत्याच मूलभूत सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. मजबुरीने अनेक वर्षे विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात राहणे पसंत केले. पिण्याचे पाणी नाही, दरवाजे, खिडक्या तुटलेल्या, शौचालयांची अवस्था अत्यंत वाईट असल्याने अलीकडेच हे वसतिगृह बंद पडले. वसतिगृह परत सुरू करण्यासाठी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी प्रयत्नही सुरू केले होते. मागील दोन महिन्यांपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. वॉर्ड अधिकाºयांवर कचरा उचलण्यासंदर्भात दररोज राजकीय दबाव येत आहे. वेगवेगळ्या वॉर्डांमधून उचलण्यात आलेला सुका कचरा ठेवायचा कुठे हा सर्वात मोठा प्रश्न होता. वॉर्ड अधिकारीही हा कचरा जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे गायब करू लागले. झोन क्रमांक १ अंतर्गत काही कचरा ऐतिहासिक टाऊन हॉलमध्ये लपवून ठेवल्याचे मागील आठवड्यात उघडकीस आले. मनपाचे बिंग फुटल्यानंतर टाऊन हॉलमधील कचरा उचलण्यात आला. आता आमखास मैदानाजवळील अण्णाभाऊ साठे वसतिगृहात वॉर्ड अधिकाºयांनी डम्पिंग यार्ड तयार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महापालिका अधिकाºयांनी वसतिगृहात फक्त कचरा साठवून ठेवला नाही, तर तेथील प्रत्येक खोलीत दररोज रात्री आग लावण्याचे ‘पाप’ही केले आहे. वसतिगृहातील सर्व भिंती धुराने काळवंडल्या आहेत. आगीने खोल्यांमधील विजेच्या तारा, दरवाजे, खिडक्याही जळून खाक झाल्या आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या मालमत्तेला आग लावल्याप्रकरणी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.कचरा उचलून माफी मागावीशिवसेनेचे उपविभागप्रमुख संदीप चांदणे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी महापौरांची भेट घेतली. त्यांना अण्णाभाऊ साठे वसतिगृहात कचरा टाकण्यात येत असून, तो जाळण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. वसतिगृहातील कचरा महापालिकेने त्वरित काढून घ्यावा व मातंग समाजाची जाहीर माफी मागावी, वसतिगृहाचा वापर पुन्हा सुरू करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी लक्ष्मण लोखंडे, प्रल्हाद मिसाळ, गणेश रोकडे, नीलेश शिंदे, कृष्णा शिंदे, आकाश कांबळे, शंकर ताकवाले, किशोर रोकडे, विकास चांदणे आदींची उपस्थित होती.
औरंगाबादच्या वसतिगृहातही जाळला कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:27 AM
आमखास मैदानाच्या जवळील अण्णाभाऊ साठे वसतिगृहातील विविध खोल्यांमध्ये महापालिकेने मागील दोन महिन्यांपासून सुका कचरा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. दररोज रात्री या कचऱ्याला आग लावण्याचे काम करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहाला कच-याचे डम्पिंग यार्ड बनविण्यात आल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ठळक मुद्देमहापालिकेचे कृत्य: अण्णाभाऊ साठे वसतिगृहात दररोज रात्री आग लावण्याचे प्रकार