लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एक आठवडा झाला तरी शहरातील कचरा कोंडी फुटत नसल्याने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घातले. तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत मनपाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते. तब्बल २० मिनिटे शहरातील कचरा प्रश्नावर चर्चा करण्यात आली. शुक्रवारी पालकमंत्री डॉ. दीपक सावंत शहरात दाखल होणार आहेत. नारेगाव येथील कचरा डेपोची पाहणी करून पालकमंत्री आंदोलक शेतकºयांसोबतही चर्चा करणार आहेत.मागील ७ दिवसांपासून मनपा प्रशासन, पदाधिकाºयांनी कचरा प्रश्नात तोडगा काढण्याचा बराच प्रयत्न केला. नारेगाव येथील आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने महापालिकेची मोठी कोंडी झाली. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे कचरा प्रश्नात शासनाने लक्ष घालावे अशी विनंती केली. पालकमंत्र्यांनी त्वरित मुख्यमंत्र्यांना शहरातील परिस्थितीची माहिती दिली. गुरुवारी दुपारी १२.४५ वाजता मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्याचे निश्चित झाले. सकाळीच महापौर घोडेले, उपमहापौर विजय औताडे, सभापती गजानन बारवाल, सभागृह नेते विकास जैन, आयुक्त डी. एम. मुगळीकर मुंबईला रवाना झाले. कॅबिनेटची बैठक संपताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबाद शहरातील कचराप्रश्नी बैठक घेतली. यावेळी पालकमंत्र्यांसह नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांची उपस्थिती होती.सायंकाळी मुंबईहून परतल्यानंतर महापौर घोडेले यांनी बैठकीचा सविस्तर तपशील पत्रकारांना दिला. यावेळी त्यांनी नमूद केले की, मुख्यमंत्री शहरातील कचरा प्रश्नात प्रचंड सकारात्मक होते. मागील तीन ते चार महिन्यांमध्ये मनपाने कचरा प्रश्नावर काय काम केले याची माहिती त्यांनी घेतली. शहरातील ओला व सुका कचरा १०० टक्के वेगळा केलाच पाहिजे. मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कचºयावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारायला हवी. सध्या मनपाने तयार केलेल्या डीपीआरनुसार सर्व यंत्रणा उभारण्यासाठी किमान चार महिने लागणार आहेत. सहा महिन्यांचा कालावधी आंदोलकांकडून वाढवून घ्यावा, असेही बैठकीत ठरले. मागील अनेक वर्षांपासून नारेगाव परिसरातील गावे कचºयाची दुर्गंधी सहन करीत आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आर्थिक मदतही देण्यास तयार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. उद्या पालकमंत्री डॉ. सावंत यांनी तातडीने औरंगाबादला जाऊन नारेगाव कचरा डेपोची पाहणी करावी, आंदोलकांसोबत चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
कचरा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:34 AM
एक आठवडा झाला तरी शहरातील कचरा कोंडी फुटत नसल्याने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घातले. तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत मनपाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते
ठळक मुद्देआज पालकमंत्री येणार : नारेगाव आंदोलकांसोबत सायंकाळी चर्चा; कोंडी फुटण्याची शक्यता