शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

लसूण म्हणतोय ‘अब की बार ४०० पार’; विक्रेते-ग्राहकांमध्ये दरवाढीवरून संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 6:02 PM

मागच्या वर्षी लसणाचे लागवड क्षेत्र कमी असल्याने तुलनेने यावर्षी लसणाची आवक कमी प्रमाणात झाली.

- पूजा येवला/ आर्या राऊतछत्रपती संभाजीनगर : जेवणात लसणाच्या पेस्टशिवाय कोणत्या भाजीचा विचार होऊच शकत नाही... पण, आता कारण लसणाच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याचे दिसत आहे. ओला लसूण १८० ते २०० रु. किलो, तर कोरडा लसूण ४५० ते ५०० रु. किलोने भाव वाढला आहे.

कांद्याप्रमाणेच लसणाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत केली जाते. खरीप लसणाची जून-जुलैमध्ये लागवड करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जाते, तर रब्बी पिकासाठीची लागवड सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये केली जाते आणि मार्च-एप्रिलमध्ये त्याची कापणी केली जाते. पण, मागच्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले.

भाववाढीची कारणे काय ?-मागच्या वर्षी लसणाचे लागवड क्षेत्र कमी असल्याने तुलनेने यावर्षी लसणाची आवक कमी प्रमाणात झाली. त्यामुळे बाजारात लसणाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.- लसणाला सातत्याने मिळणारा कमी बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचा लसूण लागवडीचा ओघ कमी झाला त्यामुळे बाजारात येणारा माल देखील कमी झाल्याचे काहींनी सांगितले.- स्थानिक व्यापाऱ्यांनी लसूण साठवणूक केल्यामुळे लसणात भाववाढ झाली. येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये नवीन लसूण मार्केटमध्ये येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर लसणाचे दर कमी होतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. लसणाचे भाव सातत्याने कमी जास्त होत आहेत त्यामुळे नेमका कधी आणि कोणत्या भावात लसूण खरेदी करावा, याबाबतीत ग्राहकांमध्ये संभ्रम वाढत आहे.

वापर कमी केलारोजच्या स्वयंपाकात लसूण हा लागतोच त्यामुळे परवडत नसला तरी लसूण हा खरेदी करावा लागतोच. त्यामुळे रोजच्या वापरात फरक पडला आहे. १०० रु. पाव भाव असलेला कोरडा लसूण घेण्यापेक्षा ५० रु. पाव भावाने ओला लसूण घेणे त्या तुलनेने परवडते.-कांचन राऊत, गृहिणी

साठवलेला वापर केलाभाव वाढल्यामुळे लसूण खरेदी केला नाही, घरात जो साठवून ठेवलेला होता तोच पुरवून वापरतेय. बाजारात गेल्यावर विक्रेते म्हणतात इतर कोणत्याही वस्तूत दर कमी होतील. पण, लसणामध्ये घासाघिस करू नका.-पुष्पा येवला, गृहिणी

ग्राहक कमी झालेदर वाढल्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. दररोज २ ते ३ किलो इतकाच लसूण विकला जातोय. खरेदीसाठी येणारे ग्राहक दर ऐकून विचार करायला लागतात आणि दर कमी करा म्हणून मागे लागतात. अवकाळी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यामुळे भाव वाढले.-भास्कर ढवण, लसूण विक्रेते

लसणाच्या दरातील वाढ :नोव्हेंबर २०२३ - २२० ते २५०डिसेंबर २०२३ - २५० ते ३००जानेवारी २०२४ - ३५० ते ४००फेब्रुवारी २०२४ - ४०० ते ४५०(सध्या ४०० रुपये किलो दरावर स्थिर)

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रmarket yardमार्केट यार्डAurangabadऔरंगाबाद