विलास भोसले ,पाटोदातालुक्यातील तीन हजारावर मजुरांनी ऊसतोडीसाठी स्थलांतरित केले आहे. मात्र, त्यांच्या नावावर धान्य उचलल्याचे सरकारी आकडेवारीरुनच समोर आले आहे. गरिबांच्या पोटात जाणाऱ्या धान्याच्या घासावरही कशी ‘दलाली’ सुरु आहे याचा हा उत्तम नमूना.तालुका कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. यंदा भीषण दु्षकाह असल्याने स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सुमारे ३ हजार १०० मजुरांनी स्थलांतर केले आहे. या मजुरांच्या नावावर सुमारे ३ हजार ६०० क्विंटल गहू व दोन हजार ४०० क्विंटल तांदूळ लाभार्थ्यांनी उचलल्याचा अहवाल दुकानदारांनी तहसील कार्यालयाला दिला आहे. तहसील कार्यालयाने देखील स्थलांतरित मजुरांचे धान्य नेमके कोणी उचलले? याची खात्री न करता अहवाल मान्य केला. अधिकारी व दुकानदारांची मिलीभगत असल्याचा आरोप क्रांती युवा मंचचे गणेश शेवाळे यांनी केला आहे. गोररगरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.३० हजारावर लाभार्थीपाटोदा तालुक्यात रेशन धान्याची १३० दुकाने आहेत. लाभार्थी संख्या ३० हजार ५७३ इतकी आहे. अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना प्रतीमाणसी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ व उपलब्धतेनुसार ३०० ते ७०० ग्रॅम साखर देण्याची तरतूद आहे. दोन लिटर रॉकेल द्यावे, असाही नियम आहे.कारवाई करुतहसीलदार विक्रम देशमुख म्हणाले, स्वस्त धान्याचे वितरण सुरळीत व्हावे, यासाठी प्रयत्न आहेत. असे काही झाले असेल तर ती गंभीर बाब आहे. नायब तहसीलदार यांच्याशी बोलून नेमके काय झाले ते सांगतो असे त्यांनी सांगितले.४तालुक्यातील ३ हजार १०० लाभार्थ्यांसाठी आलेले धान्य कागदोपत्री लाभार्थ्यांनी उचलल्याचे दाखवले आहे. मात्र, त्यांच्यापर्यंत धान्य पोहोचलेले नाही. स्थलांतरित लाभार्थी गावात नसल्याने त्यांच्या हक्काचे धान्य कोणी उचलले? याचा शोध घेण्याची मागणी क्रांती युवा मंचचे ढवळे यांनी केली. चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ढवळे यांनी केला आहे.
पाटोद्यात रेशनच्या धान्याला फुटले पाय
By admin | Published: January 18, 2015 12:01 AM