हिंगोली : वन संवर्धनासाठी शासनाकडून अनुदानावर जंगल क्षेत्रातील गावांतील लाभार्थ्यांना दरवर्षी गॅस वाटप केले जातात. वन विभागातर्फे आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील, १७२३ लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले आहेत. योजनेअंतर्गत गॅस मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना तीन वर्ष रिफीलींगवरही ७५ टक्के अनुदान दिले जाते.ग्रामीण भागात सरपणावर स्वयंपाक केला जातो, त्यामुळे जंगल क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. परिणामी वन संवर्धनाचा प्रश्न निर्माण होत आहे. याला आळा बसावा व वृक्षतोड रोखता यावी यासाठी शासनाने जंगलक्षेत्र असलेल्या गावांतील रहिवाशांना अनुदान तत्त्वावर ‘संयुक्त वन व्यवस्थापन समिती’मार्फत गॅस वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने २०१२-१३ ते २०१६-१७ मध्ये हिंगोली जिल्ह्यातील १७२३ जणांना गॅसचा लाभ दिल्याची माहिती वन विभागाने दिली. तर २०१७ मधील काही लाभार्थ्यांना गॅस वाटपाची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.गॅस खरेदीसाठी लाभार्थ्यास ७५ टक्के रक्कम ही शासनाकडून दिली जाते. तर उर्वरीत २५ टक्के रक्कम ही लाभार्थ्याना भरावी लागते.
वन संवर्धनासाठी १७२३ लाभार्थ्यांना गॅस वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 11:54 PM
वन संवर्धनासाठी शासनाकडून अनुदानावर जंगल क्षेत्रातील गावांतील लाभार्थ्यांना दरवर्षी गॅस वाटप केले जातात. वन विभागातर्फे आतापर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील, १७२३ लाभार्थ्यांना गॅस वाटप करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देदुभती जनावरे : चुलीवर स्वयंपाक केल्याने सरपणासाठी मोठ्या प्रमाणात होते वृक्षतोड