शहरं
Join us  
Trending Stories
1
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
2
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
3
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
4
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
5
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
6
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
7
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
8
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
9
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
10
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
11
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
12
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
13
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
14
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
15
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
16
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
17
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
18
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
19
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
20
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट

मनूरवाडीत गॅसचा स्फोट; दादेगावात झोपड्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2017 11:32 PM

माजलगाव/दादेगाव : तालुक्यातील मनुरवाडी येथील सरपंच दशरथ रानबा थोरात यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन लाखांचे साहित्य खाक झाले.

माजलगाव/दादेगाव : तालुक्यातील मनुरवाडी येथील सरपंच दशरथ रानबा थोरात यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन लाखांचे साहित्य खाक झाले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. दुसऱ्या घटनेत आष्टी तालुक्यातील दादेगावनजीक असलेल्या चार झोपड्या जळून खाक झाल्या. यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.माजलगाव शहरापासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या मनूरवाडी येथील सरपंच दशरथ थोरात यांच्या घरातील मंडळी दुपारी स्वयंपाक करत होते. अचानक लिकेज झाल्यामुळे गॅसने पेट धरला. त्यांची सून संगीता बाळासाहेब थोरात या घराबाहेर पडल्या. त्यानंतर टाकीचा स्फोट झाला. संपूर्ण घरात आग पसरुन संसारोपयोगी साहित्य तसेच शेतीचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. नवेकोरे साहित्य भक्ष्यस्थानीआठ दिवसांपूर्वीच दशरथ थोरात यांचा मुलगा बाळासाहेब याचे लग्न झाले होते. लग्नात आलेला पलंग, गादी, टीव्ही, कपाट, कुलर, फ्रीज, भांडे, कपडे आदी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. सुदैवाने संगीता थोरात घराबाहेर पडल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी दशरथ थोरात यांच्या खबरीवरुन ग्रामीण ठाण्यात नोंद झाली.चिमणीचा भडका झाल्याने घातदादेगाव येथील तलावाच्या कडेला भिल्ल समाजाच्या पाच-सहा वस्त्या आहेत. उन्हाळा असल्यामुळे सर्वजण झोपड्यांबाहेर झोपतात. सोमवारी रात्री दोनच्या सुमारास सर्वजण झोपलेले असताना एका झोपडीमध्ये रॉकेलच्या चिमणीचा (दिवा) भडका होऊन झोपडीने पेट घेतला. त्याचबरोबर शेजारील तीन झोपड्याही आगीत खाक झाल्या. आगीमध्ये लहानू गायकवाड, संगीता वाघ, भुजंग गायकवाड व आश्राबाई गायकवाड यांच्या झोपड्या जळून खाक झाल्या. यात संसार उपयोगी सर्व वस्तू, तसेच प्रत्येकी चार-चार ज्वारी व गहू या धान्याचे पोतेही जळून खाक झाले. (वार्ताहर)