औरंगाबाद: चिकलठाणा कलाग्राम येथे तीन दिवसापासून सुरू असलेल्या इंडस्ट्रियल अॅण्ड इंजिनिअरींग एक्स्पोच्या शेवटच्या दिवशी आज रविवारी दुपारी गॅस सिलिंडर सुरक्षित(सेफ्टी) रेग्युलेटरचे प्रात्यक्षिक(डेमो) दाखविताना आग लागली. या घटनेत संबंधित डेमोधारकाचा स्टॉल आणि अन्य पोळी मेकर यंत्राचा स्टॉल आणि मंडपाचे अछादन जळाले. सुुदैवाने या घटनेत कोणाला इजा झाला नाही. प्रदर्शन पहाण्यासाठी नागरीक गर्दी करतात तेव्हा तेथे सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना संयोजकांकडून करण्यात आल्या नव्हत्या,असे दिसून आले.
चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम येथे इंदुर येथील एका कंपनीने औद्योगिक महाक्स्पोचे आयोजन केले होते. १६ ते १८ अशा तिनदिवसीय प्रदर्शनाचा रविवारी समारोप होता. दुपारी सव्वाचा वाजेच्या सुमारास प्रदर्शनातील युनिव्हर्सल गॅस सेफ्टी या सेफ्टी डिव्हाईस या स्टॉलवर घरगुती गॅससिलिंडरवर त्यांचे रेग्युलेटर किती सुरक्षित आहे, याबाबतचा डेमो दाखविले जात होते. त्यावेळी अचानक आगीचा भडका उडाला आणि स्टॉलने पेट घेतला. यावेळी मोठी धावपळ उडाली आणि प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले लोक आणि स्टॉलधारक घाबरून पळाले. यावेळी काही जणांनी तेथील अग्निरोधक सिलिंडरच्या सहाय्याने आणि पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र काही मिनिटात आग स्टॉलच्या छतापर्यंत गेली आणि शेजारील स्टॉलही कवेत घेतला.
काही जणांनी या घटनेची माहिती अग्नीशमन दलाला कळविली आणि आग विझविण्यासाठी फायर अधिकारी एस.के. भगत, जवान थोरात, अशोक वेलदोडे, अजिंक्य आाणि चालक कोल्हे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत बºयापैकी आगीवर नियंत्रण आले होते. अग्निशमन जवानांनी पाण्याचा मारा करून संपूर्ण आग विझविली. या घटनेत मात्र किती नुकसान झाले,याबाबतची माहिती मिळू शकली नाही.