लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : शहरातील मध्यवस्तीमध्ये असणाºया खाणावळ गल्लीत एका खानावळीत गॅसची नळी लिकेज झाल्याने भडका होऊन दहापेक्षा अधिक जण भाजले. यापैकी सहा जणांना अधिक भाजल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून स्वा.रा.ती. ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.शहरातील खाणावळ गल्लीत बन्सी काळे हे घरगुती खाणावळ चालवतात. सोमवारी दुपारी स्वयंपाक सुरू असताना गॅसची नळी लिकेज होऊन पेटल्याने भडका झाला. यामध्ये विमल बन्सी काळे (४२, रा.धारूर), बालासाहेब मुंडे (३०, रा.चारदरी), सूर्यकांत सोनवळकर (२८, रा. चारदरी), संजय घोळवे (४९, रा. चारदरी) रामराव माळेकर (६०, रा. गोपाळपूर), किसन चव्हाण (४०, गोवर्धन हिवरा) यांना जास्त भाजल्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलवण्यात आले. महारूद्र पोटभारे (रा.धारूर), रमेश मोहरे (रा. गोपाळपूर), बाळू आडे (रा. गोपाळपूर) यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्नालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समजते. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने मात्र मोठी दुर्घटना घटना टळली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. खाणावळीत जेवणासाठी आलेले ग्राहकही या घटनेत जखमी झाले.
गॅसचा भडका; दहा भाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 12:51 AM