आपल्या नृत्यामुळं गौतमी पाटील कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे तिच्या कार्यक्रमदरम्यान मोठ्या प्रणामात गर्दी झाली होती. कार्यक्रम सुरू असतानाच समोर छतावर उभी असलेली काही लोक छतासह खाली कोसळली.
वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील यांची लोकप्रियता पाहता कार्यक्रम बघण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अशातच जागा कमी पडल्याने काही नागरिक परिसरातील दुकानांवर कार्यक्रम पाहण्यासाठी चढले होते. तर कार्यक्रमादरम्यान काही लोक हे एका पत्राच्या शेडच्या दुकानावर बसून कार्यक्रम बघत होते. अशातच हे पत्र्याचे शेड लोकांसह खाली कोसळले.
यापूर्वी सांगलीतील बेडग येथं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळीही लोकांनी तुफान गर्दी केली होती. तर काही जण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहत होते. यावेळी शाळेच्या कौलांचंही नुकसान झालं, तसंच शाळेच्या जाळीच्या कंपाऊंडचंही नुकसान झालेलं.