पावसामुळे यंदा पोषक वातावरण : अनेकांना मिळतोय रोजगार
सोयगाव : यंदा चांगला पाऊस असल्याने मधमाश्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, मधमाश्यांच्या पोळांची संख्याही जंगलात वाढली आहे. यामुळे सोयगाव परिसरात गावरान मधाचे प्रमाण वाढले असून, यामुळे अनेक जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
सोयगाव परिसर घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. शहरापासून जवळच वेताळवाडीचे जंगल आणि परिसरातील झाडी यामुळे सोयगावच्या जंगलात विविध फुले बहरली आहेत. या फुलांमुळे परिसरात मधमाश्यांनी मोठ्या प्रमाणात वसाहती केल्या आहेत. मधमाश्यांचे फुलांमधून मध गोळा करण्याचे काम जोरात सुरू आहे. यामुळे अनेक नागरिकांना रोजगार मिळाला असून, जंगलातून ते मध जमा करून विक्रीसाठी शहरात आणत आहेत. दोनशे रुपये किलो असा मधाला भाव मिळत आहे.
चौकट
मधाचे आयुर्वेदिक गुणधर्म
मधाला
आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान असून, अनेक रोगांवर मधाचा वापर केला जातो. नियमितपणे मधाचे सेवन केले, तर शरीरात स्फूर्ती, शक्ती आणि ऊर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वजन वाढवतेही. मधामध्ये व्हिटॅमीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्ल्याने शरीरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवितो. अन्न म्हणूनही याचा वापर केला जातो.
छायाचित्र ओळ : सोयगाव परिसरातील जंगलातील गावरान मधाचे पोळे.
310121\ynsakal75-070350350_1.jpg
सोयगाव परिसरातील जंगलातील गावरान मधाचे पोळे.