लोकमत न्यूज नेटवर्कनवीन नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व ग्रामीण कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंग विष्णूपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘वसुंधरा २०१७’ चे सर्वसाधारण विजेतेपद लातूरच्या दयानंद वाणिज्य महाविद्यालय तर उपविजेतेपद नांदेडच्या एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगने पटकाविले आहे.विष्णूपुरी परिसरातील कै़ शिवराम पवार नगरीमध्ये २३ ते २६ सप्टेंबरदरम्यान आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात विविध २८ कला प्रकारांतील स्पर्धा घेण्यात आल्या़ यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील तब्बल ७३ महाविद्यालयांच्या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.ललित कला प्रकार : चित्रकला वैयक्तिक- प्रथम पारितोषिक स्वारातीम विद्यापीठ परिसराने तर द्वितीय पारितोषिक परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाने व तृतीय क्रमांक परभणी येथील कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाने प्राप्त केले.कोलाज वैयक्तिक- प्रथम क्रमांक शिवाजी महाविद्यालय परभणी, द्वितीय- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शंकरनगर तर तृतीय क्रमांक मुदखेड येथील राजीव गांधी महाविद्यालय़पोस्टर मेकिंग वैयक्तिक - प्रथम क्रमांक मुदखेड येथील राजीव गांधी महाविद्यालय, द्वितीय- परभणीच्या संत ज्ञानेश्वर चित्रकला महाविद्यालय तर तृतीय क्रमांक नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने पटकाविला.मृदमूर्ती कला वैयक्तिक- प्रथम- स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड, द्वितीय- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड, तृतीय- शिवाजी महाविद्यालय, कंधार जि़नांदेड़व्यंगचित्रकला (वैयक्तिक) - प्रथम- यशवंत महाविद्यालय, नांदेड, द्वितीय- कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर, ता. बिलोली, तृतीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेड़रांगोळी वैयक्तिक- प्रथम- शिवाजी महाविद्यालय, परभणी, द्वितीय- प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड, तृतीय- महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर.स्थळछायाचित्र (वैयक्तिक)- प्रथम- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड, द्वितीय- हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर, तृतीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेड.कलात्मक जुळवणी- प्रथम- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी, द्वितीय- शिवाजी महाविद्यालय कंधार, तृतीय- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. वाङ्मय विभाग- वादविवाद (सांघिक)- प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, द्वितीय- यशवंत महाविद्यालय, नांदेड, तृतीय- नारायणराव चव्हाण विधि महाविद्यालय, नांदेड.वक्तृत्व स्पर्धा (वैयक्तिक)- प्रथम- स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड, द्वितीय- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर, तृतीय- बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमतनगर.संगीत विभाग- शास्त्रीय गायन (वैयक्तिक)- प्रथम- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेड, द्वितीय- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर. तृतीय- दयानंद कला महाविद्यालय, लातूर.शास्त्रीय तालवाद्य- (वैयक्तिक)- प्रथम- दयानंद कला महाविद्यालय, लातूर, द्वितीय- यशवंत महाविद्यालय, नांदेड, तृतीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग नांदेड. शास्त्रीय सूरवाद्य (वैयक्तिक)- प्रथम- स्वारातीम विद्यापीठ परिसर नांदेड, द्वितीय- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी, तृतीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग नांदेड. सुगमगायन- भारतीय (वैयक्तिक)- प्रथम- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग नांदेड, द्वितीय- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड, तृतीय- दयानंद कला महाविद्यालय, लातूर. सुगम गायन- पाश्चात्य (वैयक्तिक)- प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, द्वितीय- दयानंद कला महाविद्यालय, लातूर, तृतीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग नांदेड.समूहगायन- भारतीय (सांघिक)- प्रथम- दयानंद कला महाविद्यालय, लातूर, द्वितीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, तृतीय- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर व राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर (विभागून).समूहगायन- पाश्चात्य (सांघिक)- प्रथम- ब्रिलियंट कला व वाणिज्य महाविद्यालय, लातूर, द्वितीय- दयानंद कला महाविद्यालय, लातूर, तृतीय- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.कव्वाली (सांघिक)- प्रथम- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, द्वितीय- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय- दयानंद कला महाविद्यालय लातूर व नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड. (विभागून).महाराष्ट्राची लोककला-पोवाडा (सांघिक)- प्रथम- दयानंद कला महाविद्यालय, लातूर, द्वितीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेड, तृतीय- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड व एमजीएम कॉलेज आॅफ कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड आयटी नांदेड.लावणी (सांघिक)- प्रथम- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर, द्वितीय- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय- कॉलेज आॅफ कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी, लातूर.फोक आर्केस्ट्रॉ (लोकसंगीत सांघिक)- प्रथम- दयानंद कला महाविद्यालय, लातूर, द्वितीय- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग.जलसा (सांघिक)- प्रथम- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेड, द्वितीय- दयानंद कला महाविद्यालय, लातूर, तृतीय- ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी व एमजीएम कॉलेज आॅफ कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड आयटी, नांदेड. (विभागून). नाट्य विभाग- नक्कल (वैयक्तिक)- प्रथम- स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड, द्वितीय- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर, तृतीय दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर.विडंबन, उपरोधक अभिनय (सांघिक)- प्रथम- स्वारातीम विद्यापीठ परिसर, नांदेड, द्वितीय- एमजीएम कॉलेज आॅफ कॉम्प्युटर सायन्स अॅन्ड आयटी, नांदेड., तृतीय- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर.मूकअभिनय (सांघिक)- प्रथम- शिवाजी महाविद्यालय, उदगीर, द्वितीय- दयानंद विधी महाविद्यालय, लातूर, तृतीय- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर.एकांकिका (सांघिक)- प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर (ब्रेनवॉश), द्वितीय- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (चिंगी), तृतीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेड. उत्कृष्ट दिग्दर्शक (वैयक्तिक)- प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय लातूर (कृष्णा धूत- एकांकिका- ब्रेनवॉश), द्वितीय- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (रागिणी वल्लमपल्ले- एकांकिका चिंगी), तृतीय- शारदा महाविद्यालय, परभणी (आकाश जमदाडे- एकांकिका- यज्ञकुंड).उत्कृष्ट अभिनय (पुरुष- वैयक्तिक)- प्रथम- दयानंद वाणिज्य महाविद्यालय, लातूर (कृष्णा धूत- एकांकिका- ब्रेनवॉश), द्वितीय- राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर (अनिल पवार- एकांकिका-चिंगी), तृतीय- श्री हावगी स्वामी महाविद्यालय, उदगीर. (प्रशांत दुवे-एकांकिका- गुडबॉय गांधीजी).उत्कृष्ट अभिनय (स्त्री) (वैयक्तिक)- प्रथम- राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर (ममता चव्हाण एकांकिका- चिंगी), द्वितीय- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी (ऐश्वर्या डावरे- एकांकिका- थिंक ट्युमर), तृतीय- नूतन महाविद्यालय, सेलू (मेघना जोशी- एकांकिका भोग).शास्त्रीय नृत्य (वैयक्तिक)- प्रथम- यशवंत महाविद्यालय, नांदेड, द्वितीय- श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी, तृतीय- प्रतिभा निकेतन महाविद्यालय, नांदेड. आदिवासी नृत्य (सांघिक)- प्रथम- श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माहूर, द्वितीय- इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको, नांदेड, तृतीय- बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट. लोकनृत्य (सांघिक)- प्रथम- नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड, द्वितीय- शिवाजी महाविद्यालय, उदगीर, तृतीय- दयानंद विज्ञान महाविद्यालय, लातूर.शोभायात्रा (सांघिक)- प्रथम- ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, विष्णूपुरी, नांदेड, द्वितीय- एमजीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेड, तृतीय- कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर ता. बिलोली व श्री शिवाजी महाविद्यालय, कंधार (विभागून).
लातूरच्या दयानंद महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:57 AM