औरंगाबाद : रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते; परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बुधवारी औरंगाबादेत अधिकारी-कर्मचाºयांच्या फौजफाट्यासह १५ बोगींच्या रेल्वेने दाखल झाले. यावेळी या रेल्वेला ‘सलून’ जोडण्यात आलेले होते. त्यामुळे रेल्वेत अद्यापही व्हीआयपी संस्कृती कायम असल्याचे पाहायला मिळाले.रेल्वेचे अधिकारी जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्यांचा राजेशाही थाट दिसतो. त्यांच्यासाठी रेल्वेला विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज असे सलून अथवा ‘एक्झिक्युटिव्ह क्लास’ची बोगी जोडली जाते; परंतु अधिकाºयांनी ही शानशोकी बंद करावी आणि रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश आॅक्टोबर २०१७ मध्ये पीयूष गोयल यांनी दिले होते. रेल्वे अधिकाºयांचा पाहणी दौरा म्हणजे हा केवळ देवदर्शन, पर्यटन असे समीकरणच बनले होते. रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानंतर यावर चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार अधिकाºयांनी काही दिवस सर्वसामान्य प्रवाशांबरोबर प्रवास करून सूचनेचे पालन सुरू केले होते; परंतु पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाल्याचे पाहायला मिळत आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकपदी रुजू झाल्यानंतर दोन वर्षांपूर्वी विनोदकुमार यादव औरंगाबादच्या पहिल्याच दौºयात विशेष सलूनने दाखल झाले होते. आता पुन्हा एकदा वार्षिक निरीक्षणासाठी ते बुधवारी औरंगाबादेत आले. यावेळी निरीक्षणासाठी १५ बोगींच्या रेल्वेने ते दाखल झाले. या रेल्वेला लाल रंगाची सलूनदेखील जोडण्यात आल्याचे पाहायला मिळाले. देशातील सर्वात मोठा सेवा उद्योग असूनही परंपरेने रूढ झालेली ‘व्हीआयपी’ संस्कृती मोडीत काढण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले होते; परंतु त्यास खोडा बसत असल्याचे दिसते.एका बोगीसाठी ३० हजारांचा खर्चपाहणी दौºयासाठी वापरण्यात येणाºया एका बोगीसाठी किमान ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे १५ बोगींच्या वापरातून लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे दिसते. रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले, निरीक्षणासाठी विविधअधिकारी असतात. महाव्यवस्थपक काही बाबींची पाहणी करतात; परंतु संबंधित विभागाचे अधिकारी संपूर्ण बाबींची तपासणी करतात. त्यामुळे बोगींचा वापर करावा लागतो. त्यास मंजुरीही असते.
१५ बोगींच्या रेल्वेने आले महाव्यवस्थापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:18 IST
: रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या नियमित स्लीपर व थ्री टायर बोगीतून प्रवास करून प्रवाशांत मिसळावे, असे आदेश वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते; परंतु दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक बुधवारी औरंगाबादेत अधिकारी-कर्मचाºयांच्या फौजफाट्यासह १५ बोगींच्या रेल्वेने दाखल झाले. यावेळी या रेल्वेला ‘सलून’ जोडण्यात आलेले होते.
१५ बोगींच्या रेल्वेने आले महाव्यवस्थापक
ठळक मुद्देव्हीआयपी संस्कृ ती कायम : रेल्वेला सलूनही जोडलेले, रेल्वेमंत्र्यांच्या आदेशाला खोडा