परभणी : सांडपाण्यातील सूक्ष्म जीवांचा वापर करून ऊर्जानिर्मिती करणारे सयंत्र येथील ज्ञानोपासक महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे़ पूजा काकडे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे़ पदव्युत्तर विभागात ती शिक्षण घेत आहे़ या प्रयोगासाठी तिला डॉ़ शिवा आयथॉल यांचे मार्गदर्शन लाभले़ हा प्रयोग आविष्कार २०१५ या संशोधन महोत्सवात ठेवण्यात आला होता़ त्यास पारितोषिकही प्राप्त झाले आहे़ तसेच पदव्युत्तर विभागातील महेश राऊत या विद्यार्थ्याने बायोगॅस निर्मितीचे सयंत्र तयार केले असून, या सयंत्रालाही राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक मिळाले आहे़ ओला घनकचरा व शेणाचा वापर करून बायोगॅस तयार करण्याचे हे उपकरण त्याने तयार केले आहे़ यात मिथेन हा गॅस तयार होतो़ तो ज्वलनशील आहे़ गॅसनिर्मिती झाल्यानंतर कुजलेला कचरा खत म्हणून वापरासही सिद्ध झाला आहे़ या प्रयोगासाठी त्याला प्रा़ रोहिणी जोशी यांचे मार्गदर्शन लाभले़ हे दोन्ही सयंत्र प्रदूषण नियंत्रणास मदत करणारे आहेत़ (प्रतिनिधी)
सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने ऊर्जानिर्मिती
By admin | Published: February 17, 2016 11:05 PM