शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

...आपला आदर, प्रेम सांभाळण्याची शक्ती मिळो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:01 AM

आपले प्रेम, आदर सांभाळण्याची शक्ती भावी जीवनात मिळावी, असे भावोद्गार सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग, नो मीट इटिंग, सत्तरीपर्यंत योगासने, हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे भुजंगराव यांनी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देभुजंगराव कुलकर्णी यांचे भावोद्गार : ‘आनंदोत्सव’ उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आपले प्रेम, आदर सांभाळण्याची शक्ती भावी जीवनात मिळावी, असे भावोद्गार सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग, नो मीट इटिंग, सत्तरीपर्यंत योगासने, हे आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य असल्याचे भुजंगराव यांनी सत्काराला उत्तर देताना स्पष्ट केले.सेवानिवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांच्या शताब्दीपूर्तीनिमित्त शनिवारी भानुदास चव्हाण सभागृहात ‘आनंदोत्सव’पार पडला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते भुजंगराव कुलकर्णी यांचा गौरव करण्यात आला, तर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते ‘मी, मराठवाडा आणि महाराष्ट्र’ या त्यांच्या आत्मचरित्राचे विमोचन झाले. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी भुजंगराव म्हणाले, यशवंतराव चव्हाण हे राजकीय नेते तर होतेच; पण महान प्रशासकीय नेतेही होते. त्यांनी आम्हाला नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी निवडले, हे सौभाग्य असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी अध्यक्षीय समारोप केला. डॉ. पुरुषोत्तम भापकर, एस.बी. वºहाडे, या.रा. जाधव, डॉ. उत्तम काळवणे, राजाभाऊ धाट, राम भोगले, पद्माकर कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मंचावर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बॅरिस्टर जवाहरलाल गांधी, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस.बी. वराडे, उद्योजक राम भोगले, जलतज्ज्ञ या.रा. जाधव, डॉ. सुभाष झंवर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे माजी कार्यवाह राजाभाऊ धाट, ऊर्जा सहयोगचे अध्यक्ष डॉ. उत्तम काळवणे उपस्थित होते. प्राचार्य डॉ. शरद अदवंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. रसिका देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सारंग टाकळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अभय कुलकर्णी यांनी आभार मानले.विभागीय आयुक्तांना कानपिचक्यायावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना कानपिचक्या दिल्या. भुजंगराव यांच्या कार्याचा आदर्श घेऊन प्रशासनात कारभार केला पाहिजे. केवळ त्यांना शुभेच्छा न देता त्यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञानाची मदत घेत प्रशासनाला गती द्यावी, असेही बागडे यांनी भापकरांना उद्देशून म्हटले.आयएएस प्रशिक्षण केंद्राला भुजंगरावांचे नाव द्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आयएएस प्रशिक्षण केंद्राला भुजंगरावांचे नाव द्यावे, अशी मागणी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष आणि विभागीय आयुक्तांकडे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने केली.