घाटनांद्रा गावात एकूण १,६५० घरगुती विजेचा वापर करणारे ग्राहक आहेत. त्यापैकी तब्बल ५५० ग्राहकांकडे पंधरा लाख दहा हजारांची थकबाकी आहे. दिवसेंदिवस या थकबाकीदार ग्राहकांमध्ये वाढ होत आहे. येथे वीज बिल भरणा केंद्र नसल्याने सुद्धा थकबाकीदारांची संख्या वाढत असल्याची तक्रार ग्राहक माजी सरपंच शिवनाथ चौधरी यांनी केली. महावितरण कंपनीने त्वरित वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे.
शिवाय शासनाकडून वारंवार वीज बिल माफीच्या निर्णयाकडे सुद्धा अनेक ग्राहक डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे देखील थकबाकीदारांची संख्या वाढत आहे. तरीसुद्धा ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा करून महावितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन सहायक अभियंता प्रदीप निकम यांनी केले. तसेच ग्राहकांना काही अडचण असल्यास लाईनमन दिवाकर झाडे, रंगनाथ गोंधळे, संतोष सुलताने यांची मदत मिळू शकते.