छत्रपती संभाजीनगर : ‘घोडी पे होके सवार चला है दुल्हा यार.. कमरिया मै बाँधे तलवार’... या ओळी वाचल्यावर तुम्हाला मोहम्मद रफी यांनी गायलेले गाणे आठवले असेल. होय, अगदी बरोबर, १९७३ मध्ये रुपेरी पडद्यावर झळकलेल्या ‘गुलाम बेगम बादशाह’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे तोंडात रेंगळण्याचे कारण, म्हणजे आता लग्न सराईला सुरुवात होत आहे. कित्येक दिवसांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला नवरदेव ज्या क्षणाची वाट पाहत होते तो ‘घोड्यावर बसून वरात’ काढण्याचा क्षण जवळ येऊन ठेपला आहे. अशा नवरदेवांना आपल्या पाठीवर बसवून वरातीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शहरात आजघडीला ७४ घोडा-घोडींना सजवून ठेवण्यात आले आहे.
शहरात किती घोडा-घोडी आकडेवारीत१) घोडे--- ५४२) घोडी--- २०३) त्यात डान्स करणारे घोडे- ५
एका वरातीसाठी किती आकारले जाते भाडे१) घोडा--- ३५०० ते ४००० रु.२) घोडी---४५०० ते ५००० रु.
घोड्याचे रथ व जीप किती१) घोड्याचे रथ-- १०२) सजविलेल्या जीप-२०
वरातीसाठी घोडा-घोडीची बुकिंग फुल्ललग्नसराईला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. नोव्हेंबर महिन्यात ६ लग्नतिथी तर डिसेंबरमध्ये १० लग्नतिथी आहेत. या तिथींवर होणाऱ्या लग्नाच्या वरातीसाठी घोडा-घोडींची बुकिंग पूर्ण झाली आहे. जे लग्न वेळेवर लागतात त्यांची ऑर्डर आम्ही पहिले घेतो. त्यानंतर उशिरा लग्न लागणाऱ्यांचे बुकिंग घेतले जाते. एका दिवसात २ ते ३ लग्नासाठी घोडा बुकिंग केला जातो.- रमेश तांबे, घोड्यांचे मालक
वरातीत घोड्यापेक्षा घोडीचे भाडे अधिकअनेक समाज असे आहेत की, त्यात घोड्यांऐवजी घोडीला वरातीसाठी जास्त पसंती दिली जाते. घोडीही वरातीसाठी शुभ मानली जाते. यामुळे घोड्यांपेक्षा घोडीचे भाडे जास्त असते. घोडा असो की घोडी त्यांना तंदुरुस्त ठेवणे, देखभाल करणे यावर अधिक खर्च लागतो. शक्यतो पांढऱ्या व काळ्या गडद रंगाच्याा घोडा, घोडीला पसंत केले जाते.- सय्यद आझम, बॅन्डपथक मालक
तिथी: नोव्हेंबर : १७, १८, २२, २३, २४, २५.डिसेंबर : २, ३, ४, ५, ९, १०, ११, १३, १४, १५