मागील आठ-दहा वर्षांपासून या परिसरात अद्रक लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. तर मागील तीन वर्षांपासून अद्रकाला चांगला दर मिळत मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत आला. असे असले तरी यंदा अद्रकीचे बेने कमी दरात मिळू लागल्याने पुन्हा शेतकरी अद्रक लागवडीकडे वळला आहे. यंदा तरी चांगला भाव अद्रकाला मिळेल, अशी आशा त्यांना होती. मागील वर्षी सातत्याने लॉकडाऊन राहिल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करता आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. यंदा बियाणे कमी दराने मिळत असले तरी रासायनिकबरोबरच सेंद्रिय खतांच्या वाढलेल्या किमती, मजुरांचे वाढलेले दर त्यामुळे शेतकऱ्यांना अद्रक लागवडीसाठी कसरत करावी लागत आहे.
050621\img-20210605-wa0035.jpg
गल्ले बोरगाव परिसरात आले पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत आहे. (छाया : दिलीप मिसाळ)