औरंगाबाद : सुरेख गोलंदाजी आणि त्यानंतर तडाखेबंद फलंदाजी करणाºया कर्णधार गिरिजानंद भक्तच्या कामगिरीच्या बळावर शहर पोलीस अ संघाने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. त्यांची गाठ मसिआ संघाविरुद्ध होणार आहे.शुक्रवारी एडीसीए स्टेडियमवर झालेल्या व्हेरॉक करंडक औद्योगिक ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शहर पोलीसने ग्रामीण पोलीसचा २ गडी राखून चित्तथरारक विजय मिळवला. दुसºया उपांत्य फेरीत मसिआ संघाने स्कोडा संघाला नमवताना अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले.पहिल्या उपांत्य फेरीत स्कोडा संघाने २0 षटकांत ७ बाद १३५ धावा केल्या. त्यांच्याकडून संदीप खोसरेने ३९ चेंडूंत ३७, विजय मेहेत्रेने २५, नझीम शेखने १८, विजय हंडोरेने १६ व विपुल भोंडेने १२ धावा केल्या. मसिआ संघाकडून हितेश पटेल व राहुल शर्मा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. रोहन राठोड, मधुर पटेल, अतिक नाईकवाडे यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. प्रत्युत्तरात मसिआने विजयी लक्ष्य १९.४ षटकांत ६ गडी गमावून १३८ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून अतिक नाईकवाडेने ३६ चेंडूंत ६ चौकारांसह नाबाद ३६ धावा केल्या. संदीप भंडारीने ३१, रोहन राठोडने २१, राहुल शर्माने ३१ व मधुर पटेलने २१ धावांचे योगदान दिले. स्कोडा संघाकडून संदीप खोसरेने १६ धावांत २ गडी बाद केले. योगेश भागवत व विजय मेहेत्रे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.दुसºया उपांत्य फेरीत ग्रामीण पोलीसने ४ बाद १३७ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून अजय काळेने ५८ चेंडूंत ८ चौकारांसह ६६, विकास नगरकरने २३ धावा केल्या. शहर पोलीसकडून गिरिजानंद भगतने भेदक मारा करताना २५ धावांत ३ गडी बाद केले. शेख इफ्तेखारने १ बळी घेतला. प्रत्युत्तरात गिरिजानंद भक्त याने मोक्याच्या क्षणी अवघ्या १८ चेंडूंतच ५ टोलेजंग षटकारांसह फटकावलेल्या ३८ धावांच्या बळावर शहर पोलीसने विजयी लक्ष्य १९ व्या षटकांत ८ गडी गमावून गाठले. सलामीवीर शेख मुकीमने २४ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह २२ व अरविंद शेजूळने ३ चौकारांसह २२ धावांचे मोलाचे योगदान दिले. ग्रामीण पोलीसकडून विकास नगरकरने १८ धावांत ३, अजय काळेने २, तर संजय सपकाळ व संदीप जाधव यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
गिरिजानंद भक्तच्या अष्टपैलू खेळीने शहर पोलीस फायनलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:38 AM
औरंगाबाद : सुरेख गोलंदाजी आणि त्यानंतर तडाखेबंद फलंदाजी करणाºया कर्णधार गिरिजानंद भक्तच्या कामगिरीच्या बळावर शहर पोलीस अ संघाने दिमाखात ...
ठळक मुद्देविजेतेपदासाठी मसिआ संघाविरुद्ध होणार लढत