अल्पवयीन मुलगी आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गुरुवार (दि.१) आईवडील घरी नसताना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास लहान बहिणीला मेडिकलमध्ये जाऊन येते असे म्हणून ती घराबाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ही अल्पवयीन मुलगी घरी न परल्याने तिच्या पालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
-------------------------
बजाजनगरातुन दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : बजाजनगरातून दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्यांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी एकनाथ वाडगे (रा.बीकेटी सोसायटी, बजाजनगर) यांनी ३० मार्चला रात्री घरासमोर दुचाकी ( एम.एच.२०, एफ.व्ही. ७१४७) उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरून नेली.
------------------------
सिडकोत दुचाकीस्वार जखमी
वाळूज महानगर : रस्ता अपघातात दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. प्रकाश बद्दु (५२ रा.तीसगाव परिसर) हे दुचाकीने (क्र.एम.एच.२०, बी.जे.९८४३) बुधवारी रात्री घरी जात होते. शंभुराजे चौकात अपघात होऊन ते जखमी झाले. या अपघाताची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.
-------------------------------
वाळूजला सेवानिवृत्त शिक्षिकेस निरोप
वाळूज महानगर : वाळूज येथील नूतन कन्या विद्यालयाच्या शिक्षिका महाजन या नुकत्याच सेवानिवृत झाल्याने त्यांना शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मगर तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष पारसचंद साकला हे होते. यावेळी शाळेच्या वतीने महाजन यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती देऊन त्यांना निरोप देण्यात आला.
--------------------
वाळूजमहानगरात सायंकाळनंतर सामसूम
वाळूज महानगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्री ८ वाजेनंतर दुकाने बंद करण्याचे आदेश बजावल्याने वाळूजमहानगरात सायंकाळनंतर सर्वत्र सामसूम पहावयास मिळत आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्री ८ नंतर दुकाने उघडे ठेवणाऱ्या व्यवसायिकांविरुध्द कारवाई करीत असल्याने व्यवसायिक दुकाने बंद करुन घरी निघून जातात. या परिसरात रात्री ८ वाजेनंतर सर्वत्र सामसूम होत असल्याने नागरिकही घराबाहेर पडणे टाळत आहेत.
--------------------------