---
औरंगाबाद : आदर्श शिक्षक पुरस्कारात उर्दू माध्यमातील शिक्षकांना सहभागी करून घ्या, पुरस्कार देऊन त्यांचेही मनोबल वाढवा, अशी मागणी शिक्षक समितीने जिल्हा परिषदेकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात उर्दू माध्यमाच्या ५० शाळा असून, १०० पेक्षा अधिक शिक्षक आहेत. तळागाळातील कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या मुलांना ज्ञानदानाचे काम करताना गेल्यावर्षी शासनाने उर्दू शाळेच्या आणि मराठी शाळेचा यू-डायस क्रमांक वेगळा केला. त्यामुळे उर्दूलाही स्वतंत्र दर्जा मिळून स्वतंत्र अधिकार मिळाले. शिक्षकदिनी जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यात उर्दू शिक्षकांनाही स्वतंत्र समावून घेऊन पुरस्कार द्यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष साळकर, जिल्हा सरचिटणीस रंजीत राठोड, उर्दूचे जिल्हाध्यक्ष जावेद अन्सारी, पाशू शहा, गौस शेख यांनी अध्यक्षा मीना शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, शिक्षण सभापती अविनाश गलांडे पाटील, शिक्षणाधिकारी बी. बी. चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.